राक्षसभुवन दि. लोकाशा न्युज दरम्यान अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्या हायवासह दोन ट्रक वाळूसह ताब्यात घेऊन जवळपास 50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . हि कारवाई गेवराई तालुक्यातील सुरळेगाव येथे तहसीलदार सचिन खाडे यांच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री केली . दरम्यान मागील काही महिण्यापासून महसूल प्रशासन अवैध वाळू वाहतूकीविरोधात सातत्याने कारवाई करत असून यामुळे वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत . गेवराई तालुक्यातून गेलेल्या गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळू उपसा करुन ती चोरट्या मार्गाने वाहतूक केली जाते . नदीपात्रात पाणी असताना देखील वाळू माफिया केनीच्या सहाय्याने दिवसभर वाळू उपसा करुन ती रात्री हायवा व ट्रकम 1 चोरट्या मार्गाने वाहतूक करतात . याविरोधात महसूल , पोलिस प्रशासन सातत्याने कारवाई करत असताना देखील वाळू माफिया या कारवायांना भीक घालत नसून महसूल , पोलिस अधिकाऱ्यांवर पाळत ठेवून वाळू उपसा व वाहतूक करतात . बुधवारी रात्री अशाचप्रकारे गेवराई तालुक्यातील सुरळेगाव याठिकाणाहून वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच तहसीलदार सचिन खाडे यांनी पथकासह त्याठिकाणी धाड टाकली . यावेळी एक हायवा , दोन ट्रक वाळूसह ताब्यात घेऊन जवळपास 50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . हि वाहने चकलांबा पोलिस ठाण्यात लावण्यात आली आहेत .