बीड । दि. २५ ।
बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला मार्च २०२२ पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.देशातील ८० कोटी नागरीकांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या योजनेला वाढीव मुद्दत दिल्याबद्दल खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
कोरोनाच्या संकटात देशातील सर्वसामान्य नागरीकांना आधार देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना राबवून मोफत अन्नधान्य उपलब्ध करून दिले होते.कोरोनामुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीत ही योजना सर्वसामान्यांसाठी जीवनदायी ठरली होती. बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत या योजनेला वाढीव मुद्दत मिळाल्यानंतर खा.प्रितमताई मुंडे यांनी प्रधानमंत्री मोदी यांचे ट्विट करत आभार मानले.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना मार्च २०२२ पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय अंत्योदयाच्या दृढ संकल्प अधोरेखित करणारा आहे.देशातील ८० कोटी नागरिकांच्या हिताचा निर्णय घेऊन योजनेला वाढीव मुद्दत दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार’ असे खा.प्रितमताई मुंडे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.
•••••