Uncategorized

अंबाजोगाईत शिक्षिकेची आत्महत्या

अंबाजोगाई : येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका संगीता जाधवर चाटे ( वय ४५ ) यांनी दोन दिवसांपूर्वी विषारी औषध प्राशन केले होते. त्यांच्यावर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. अंबाजोगाई येथील मुकुंदराज कॉलनी परिसरात राहणाऱ्या संगीता चाटे या नंदागौळ येथे शिक्षिका होत्या. दोन दिवसांपूर्वी त्यांनी विषारी औषध प्राशन केल्याने उपचारासाठी त्यांना स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती , एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. अंबाजोगाई पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. पोलीस तपासा नंतरच आत्महत्येचे कारण उलगडणार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!