Uncategorized

जिल्हा खाकी अलर्ट, दिपावली सणानिमित्ताने दहशतवाद विरोधी कक्ष, बॉम्ब शोधक व नाशक श्वान पथकाने बीड शहरात केली तपासणी


बीड, 2 नव्हेंबर रोजी बीड शहरात एन . के . कलेक्शन सुभाष रोड बीड , मौजकर वस्त्र भंडार जुना मोंढा , बीड बसस्थानक या ठिकाणांवर वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी कक्ष व बॉम्ब शोधक व नाशक श्वान पथक यांच्या संयुक्त विद्यमाने दिपावली सण उत्सावाचे काळात अतिरेकी , असामाजिक तत्वांकडून घातपाताच्या कारवायांना पायबंद घालण्याचे अनुषंगाने मोहिम राबविण्यात आली . त्यामध्ये जनतेस बेवारस वस्तु / बॉम्ब सदृश्य वस्तू मिळून आल्यास घेवयाची खबरदारी तसेच तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये संपर्क करणे याबाबतची जनजागृती आणि सध्याचा वाढता कोरोना प्रादूर्भावा बाबत , साथीचे रोग व उपाययोजना अनुषंगाने सुचना देवून जनजागृती करण्यात आली . सदर मोहिमे दरम्यान बीड शहरातील एन . के . कलेक्शन सुभाष रोड बीड , मौजकर वस्त्र भंडार जुना मोंढा , बीड बसस्थानक येथे बॉम्ब शोधक व नाशक श्वान पथक यांचेकडील अत्याअधुनिक यंत्राचे साहित्याने व श्वानचे मदतीने बेवारस वस्तूची घातपात विरोधी तपासणी करण्यात आली . सदर कारवाई दरम्यान दहशतवादी विरोधी पथकाचे स.पो.नि. श्री . एल . आर . कांबळे , सफौ / राजाभाऊ नागरगोजे , पोह / अशोक नलावडे , राजाभाऊ वंजारे , राहूल घाडगे हे हजर होते . तसेच बॉम्ब शोधक व नाशक श्वान पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री . आर . बी . मोरे , पो.ह. मच्छिद्र बडे , देविदास जमदाडे , प्रकाश वैद्य , चापोह राजेंद्र सांगळे , शिवाजी धोंगडे व श्वान मार्शल हे सहभागी झाले होते . तरी बीड शहरातील सर्व व्यापारी व नागरिकांनी सण – उत्सवाचे काळात त्यांचे आजूबाजूचे परिसरात सार्वजनिक ठिकाणी संशयीत वस्तू , व्यक्ती आढळून आल्यास त्वरीत पोलीस नियंत्रण कक्ष , बीड येथे 02442-222333 , 02442-222666 दहशतवाद विरोधी कक्ष बीड- मो.नं. 9767101172 बॉम्ब शोधक व नाशक पथक 02442-227644 , मो.नं. 9421957403. येथे संपर्क करुन कळवावे असे बीड पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येत आहे .

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!