बीड : क्रेडीट कार्डला लागणारे सर्व शुल्क बंद करण्याचे आमिष दाखवून भामट्या महिलेने शिक्षिकेला ‘ एनी डेस्क ‘ नावाचे मोबाईल अॅप डाऊनलोड करायला लावले . नंतर त्या अॅपच्या माध्यमातून शिक्षिकेच्या बँक खात्यातून १ लाख ९ ५ हजार रुपये काढून घेतल्याची घटना बीडमध्ये उघडकीस आली आहे . जयश्री दत्तात्रय माथेसूळ असे त्या फसवणूक झालेल्या शिक्षिकेचे नाव आहे . त्यांच्याकडे एसबीआय बँकेचे क्रेडीट कार्ड आहे . ९ ऑक्टोबर रोजी त्यांना पूजा नामक महिलेचा कॉल आला . तुमच्या क्रेडीट कार्डला लागणारे सर्व शुल्क बंद करून देते असे आमिष तिने माथेसूळ यांना दाखवले . त्यासाठी तिने क्रेडीट कार्डचा नंबर घेतले आणि ‘ एनी डेस्क ‘ नावाचे मोबाईल अॅप इन्स्टॉल करण्यास सांगितले . त्यानंतर विविध मेसेज टाईप करून पाठविण्यास सांगितले . तेवढ्यात त्यांचा मुलगा तिथे आला आणि त्याने आईच्या हातातून फोन घेऊन बंद केला . त्यानंतर शुक्रवारी
ऑनलाईन मोबाईल खरेदी करताना कार्डची लिमिट संपल्याचा मेसेज आल्याने त्यांनी खाते तपासले असता त्यातून १ लाख ९ ५ हजार रुअप्ये काढून घेतल्याचे लक्षात आले . याप्रकरणी जयश्री दत्तात्रय माथेसूळ यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला .















