Uncategorized

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात ऑल आऊट ऑपरेशन, 66 गुन्हेगार वस्त्या तपासल्या, दोन हिस्ट्रीशिटर पकडले, 128 समन्स, 71 आरोपींना काढले वॉरंट


बीड, दि. 28 (लोकाशा न्यूज) : गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक राजा रामा स्वामी यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस यंत्रणेला सक्त सुचना दिल्या आहेत. त्यामध्ये रात्रीची पेट्रोलींग, अचानक नाकाबंदी, ऑल आऊट ऑपरेशन, कोम्बींग ऑपरेश याबाबत सुचना देवून सर्व यंत्रणेला अलर्ट करण्यात आले आहे. यामध्ये दि. 26 ऑक्टोबर 2021 रोजीचे 23.00 वाजेपासुन ते दि. 27 ऑक्टोबर 2021 रोजीचे सकाळचे 05.00 वाजेपर्यंत सर्व 28 पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ऑल आऊट ऑपरेशन करण्यात आले आहे. त्यामध्ये गुन्हेगारांच्या वसत्या तपासणे, नाकाबंदी करण्याच्या कारवाईमध्ये 61 अधिकारी व 262 पोलीस अंमलदारांनी कर्तव्य बजावले आहे. या कारवाई दरम्यान 66 गुन्हेगारवस्त्या तपासून 25 हिस्ट्रीशिटर चेक करण्यात आले. त्यामधून 02 पाहिजे / फरारी पकडण्यात आले आहेत. 128 समन्स व 71 वॉरंट बजावण्यात आले आहेत. 1369 वाहने तपासण्यात आली, त्यामध्ये वाहनांवर कारवाई करुन 49,500 / – रु.दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच 59 लॉजेस् चेक करण्यात आलेले आहेत. सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली जिल्हयातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!