बीड, दि. 28 (लोकाशा न्यूज) : जिल्हा परिषदेअंतर्गत विविध कार्यरत असणार्या परिचर (शिपाई) संवर्गातील 24 कर्मचार्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. या 24 कर्मचार्यांची पदोन्नतीचे आदेश गुरूवारी निर्गमित करण्यात आले आहेत. या 24 कर्मचार्यांपैकी 16 कर्मचार्यांना कनिष्ठ सहाय्यक लिपिक या संवर्गात तर 8 कर्मचार्यांना कनिष्ठ सहाय्यक लेखा या संवर्गात पदोन्नती देण्यात आली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर पदोन्नती देण्यात आल्यामुळे परिचर संवर्गात आनंदाचे वातावरण असून या कर्मचार्यांनी व परिचर संघटनांनी सीईओ अजित पवार यांचे आभार मानले आहेत.
सीईओ अजित पवार हे जिल्हा परिषद, बीडमध्ये हजर झाले पासून प्रशासन गतीमान झाले असून विविध विभागाचे प्रलंबित प्रश्न तात्काळ निकाली निघत आहेत. श्री अजित पवार यांच्या कार्यशैलीमुळे जिल्हा परिषद कर्मचारी हे उत्साहात व विनादबाव काम करीत असल्यामुळे विविध योजना व कर्मचार्यांचा प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक याला गती मिळत आहे.















