Uncategorized

भटक्या-विमुक्त जमातीमधील नागरिकांना न्याय मिळणार; जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायर्‍यांवर ठिय्या मांडताचा यंत्रणा आली ताळ्यावर, मुंडे भगिणींच्या नेतृत्वात डॉ. लक्ष्मण जाधवांनी यशस्वी केले आंदोलन


बीड, दि. 25 (लोकाशा न्यूज) : भटक्या-विमुक्त जमातीमधील प्रत्येक नागरिकांना न्याय मिळावा हे आपल्या डोळ्यासमोर ठेवून भाजपचे डॉ. लक्ष्मण जाधव हे मुंडे भगिणींच्या नेतृत्वात सक्षमपणे काम करीत आहेत. या समाजातील नागरिकांच्या वेगवेगळ्या अडचणींसाठीच डॉ. जाधव यांनी सोमवारी समाजातील अनेकांना आपल्या सोबत घेवून जिल्हाधिकारी कार्यालयातील एका ईमारतीच्या पायर्‍यांवर ठिय्या मांडला. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाची यंत्रणा तात्काळ ताळ्यावर आली. समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या लवकरच मार्गी लावल्या जातील, असे आश्‍वासन यावेळी संबंधित अधिकार्‍यांनी डॉ. लक्ष्मण जाधवांना दिले आहे.
सोमवारी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भटक्या -विमुक्त जमातीसाठी भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारानुसार राज्य व केंद्र सरकारच्या अनेक शासकीय योजना कार्यान्वित करण्यात याव्यात यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीच्या पायरीवरच बसून जोपर्यंत अधिकारी येऊन भटक्या-विमुक्त जाती जमातीतील टकारी व मसणजोगी समाजाच्या मूलभूत सुविधा मार्गी लावण्यासाठी ठोस पावले उचलत नाहीत, तोपर्यंत येथून उठायचे नाही असे ठरवले, त्यानंतर तात्काळ यत्रंणा हलली, 15 दिवसात याबाबत सकारात्मक विचार करु, असे निवासी जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना,पंतप्रधान आवास योजना, रेशनकार्ड,जातीचे प्रमाणपत्र,संजय गांधी निराधार योजना,श्रावणबाळ योजना,आधारकार्ड,रस्ते,वीज,नाली,वस्तीगृह,वसंतराव नाईक महामंडळ भरीव निधीची तरतूद व तात्काळ कर्ज वाटप करण्यात यावेत, वस्ती शाळा, क्रीमीलिअरची अट शिथिल करण्यात यावी व भटक्या-विमुक्तांना अ‍ॅट्रासिटीचे कवच कुंडले प्रदान करण्यात यावी, यासंदर्भात निगडित अधिकारी व संबंधित मंत्र्यांपर्यंत आमची मागणी पोहचवावी, असे जमातीच्या वतीने सांगण्यात आले. विविध मूलभूत सुविधाच्या  संदर्भात तात्काळ तहसिलदार व समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना पत्र काढुन न्याय मिळवून व आपल्या हक्काच्या मागण्या संदर्भात लवकरच पाठपुरावा सुरू करतो असे निवासी जिल्हाधिकार्‍यांनी  सांगितले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, डॉ. लक्ष्मण जाधव, विलास बामणे, संदीप उबाळे, हनुमंत मोरे व जमातीतील पुरुष व महिला भगिनी उपस्थित होते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!