माजलगाव दि .25 : शहरातील बसस्थानकाच्या शौचालयाच्या परिसरात एक मयत अर्भक आढळून आल्याने खळबळ उडाली आहे घटनास्थळी माजलगाव शहर पोलिसांनी धाव घेतली असून अर्भक माजलगाव ग्रामीण रुग्णालयात आणले आहे . माजलगाव येथील बस्थानाकाच्या परिसरामध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर सोमवारी ( दि .25 ) सकाळी एक मयत अर्भक आढळून आले . याची माहिती मिळताच माजलगाव शहर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली .
अर्भक ताब्यात घेत माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे . अर्भक स्त्री जातीचे की पुरुष जातीचे हे समजू शकले नाही . 5 ते 6 महिन्याचे हे अर्भक असल्याची माहिती आहे .
अर्भक कुणाचे आहे ? कुणी फेकले आदी तपास माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि . लक्ष्मण केंद्रे , अविनाश राठोड , पोलिस जमादार तोटेवाड , ठेंगल , चालक श्रिमंत पवार महिला कर्मचारी मिना काळे या पुढील तपास करत आहेत . या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.















