Uncategorized

मध्यप्रदेशातील पोटनिवडणुकीत दिसला लोकनेते मुंडे साहेबांच्या नेतृत्वाचा प्रभाव,पंकजाताई मुंडेंच्या उत्स्फूर्त सभा ; काँग्रेसवर निशाणा साधत मतदारांसमोर ठेवला मोदी सरकारचा विकास

इंदौर ।दिनांक २३।
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचा प्रचाराचा धडाका आज दुसर्‍या दिवशीही सुरूच होता. काल व आज झालेल्या विविध जाहीर सभांमधून या भागातील मतदारांमध्ये लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचा प्रभाव असल्याचे दिसून आले, याचा निश्चित फायदा भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांना होणार आहे. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाचा आलेख जनतेसमोर प्रभावीपणे मांडत काॅग्रेसवर निशाणा साधला.

खंडवा लोकसभा पोटनिवडणूकीतील भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील यांच्या प्रचारार्थ मांधाता विधानसभा मतदारसंघातील मुंदी व भीकनगांव क्षेत्रातील सतवाडा आणि झिरन्या येथे उत्स्फूर्त प्रचार सभा झाल्या. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय, उमेदवार ज्ञानेश्वर पाटील, कविता पाटीदार यांच्यासह स्थानिक आमदार यावेळी उपस्थित होते.

आपल्या भाषणात पुढे बोलतांना पंकजाताई म्हणाल्या तब्बल ४१ वर्षांनंतर या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. मतदान नेहमी सत्ताधारी पक्षालाच होत आले आहे, असा इथला इतिहास आहे. आज ज्याला तुम्ही खासदार करणार आहात, तो फक्त खासदार न राहता सत्ताधारी पक्षाचा खासदार होऊन दिल्लीला जाणार असल्याचे त्या म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेसारखे कणखर नेतृत्व व त्यांनी गोरगरीबांसाठी केलेली कामे यामुळे या भागाचे प्रश्न नक्की सुटतील.

काँग्रेस म्हणजे ओसाड जमीन

माझी विनंती आहे की मोठ्या संख्येने मतदान करून, आपल्या उमेदवाराला विजयी करा. जर तुम्ही काँग्रेसला मत दिले तर ते कोरड्या ओसाड जमिनीवर थेंबासारखे पडते, ते नाहीसे होते आणि त्या मताला काही अर्थ राहणार नाही. जर तुम्ही भारतीय जनता पक्षाला मत दिलं, तर फुलाच्या आत जसा नवा ठिपका पडतो, त्यातून नवे कमळ फुलते, त्याचा परिणामही तसाच होईल. पीएम मोदींनी पाठवलेल्या विकासामुळे तुमचे घर उजळेल असे त्या म्हणाल्या.

लोकनेत्याचा प्रभाव

पंकजाताई मुंडे यांच्या सभा कालपासून ज्या ज्या ठिकाणी झाल्या तिथल्या मतदारांमध्ये लोकनेते मुंडे साहेबांचा या भागात किती प्रभाव आहे हे दिसून आले, त्यांना मानणारा मोठा वर्ग इथे आहे. महाराष्ट्राप्रमाणेच इथला मतदारही पंकजाताईं मध्येच साहेब पाहतो. आजच्या सभांमध्येही पंकजाताईंनी आपल्या नेहमीच्या शैलीत मतदारांशी थेट संवाद साधला. बंजारा भाषेत बोलून त्यांची मनं जिंकली. यावेळी समाज बांधवांनी त्यांचे तीर कमान देऊन स्वागत केले.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!