Uncategorized

ऊसतोड कामगारांचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू


धारूर ( बीड ) : ऊस तोडणी करत असताना पाणी आणण्यास गेलेल्या गांजपूर येथील एका उसतोड कामगाराचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी बेळगाव ( कर्नाटक ) येथे घडली . तानाजी संभाजी थोरात ( ३५ ) असे मृत उसतोड कामगाराचे नाव आहे . तो कर्नाटक येथील बेळगी सहकारी साखर कारखाना येथे ऊसतोडणीचे काम करण्यास गेला होता . तालुक्यातील गांजपूर येथील तरुण तानाजी संभाजी थोरात हा कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील बेळगी सहकारी साखर कारखान्यात ऊस तोडणीसाठी पंधरा दिवसा पूर्वी गेलेला होता . शुक्रवारी दुपारी तो ऊस तोडणी करत असलेल्या शेतातील विहिरीत पाणी आणण्यासाठी गेला . यावेळी अचानक पाय घसरून विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला . त्याच्या पश्चात पत्नी आई असा परिवार आहे . गरीब कुटुंबातील मोल मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या तरुणाच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे .

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!