बीड,- शेतीच्या वादातून दोन गटांमध्ये हाणामारीची घटना घडली. यात चारपेक्षा जास्त लोक जखमी झाले. जखमींवर बीड शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना धारूर तालुक्यातील पिंपरवाडा येथे घडली.
विठ्ठल तिडके, दादाराव तिडके, दत्तात्रय तिडके, मधुकर तिडके यांना बिभिशन तिडके अन्य लोकांनी लाठ्या-काठ्याने मारहाण केली. या मारामारीत बिभिशन तिडके यांच्या घरातील लोकही जखमी झाले. दोन्ही गटातील लोक जखमी झाल्याने त्यांच्यावर बीड शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदरील ही मारहाणीची घटना शेतीच्या वादातून घडली असल्याचे सांगण्यात आले.















