Uncategorized

हो… तुम्ही सांगायचे मी करायचे, आपला दसरा आपली परंपरा! पंकजाताई मुंडेंनी दिलं दसरा मेळाव्याचं निमंत्रण ; व्हिडीओ तुफान व्हायरल

मुंबई ।दिनांक १३।
हो… तुम्ही सांगायचे मी करायचे, आपला दसरा आपली परंपरा..! अशा सूचक शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी तमाम कार्यकर्त्यांना दसरा मेळाव्याचं निमंत्रण दिलं आहे. या आशयाचा एक व्हिडीओ त्यांनी फेसबुकवर पोस्ट केला असून तो तुफान व्हायरल झाला आहे.

कोरोना मुळे तब्बल दोन वर्षानंतर सावरगांव घाट येथील राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जन्मगांवी होणाऱ्या दसरा मेळाव्याला  पंकजाताई मुंडे संबोधित करणार आहेत. या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. स्वत: खासदार प्रीतमताई मुंडे यांनी काल या मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर पंकजाताई मुंडे यांनीही एक व्हिडीओ ट्विट करून समर्थकांना सावरगांव घाट येथील भगवान भक्तीगडावर दसरा मेळाव्यासाठी येण्याचं आवाहन केलं आहे. हो… तुम्ही सांगायचे मी करायचे, आपला दसरा आपली परंपरा!!, असं त्या व्हिडीओतून सांगताना दिसत आहेत.

पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओतून त्यांनी समर्थकांना दसरा, दसऱ्याची परंपरा, भगवान भक्तीगडाचं महत्त्व, लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचं मेळाव्याशी असलेलं नातं आणि त्यांची परंपरा यावर प्रकाश टाकला आहे.

पंकजाताई काय म्हणाल्या?

‘तुम्ही आदेश द्यायचा आणि मीच झेलायचा हे आपलं नातं आहे. तुमचा आदेश आला… ताई मेळावा झालाच पाहिजे… मेळावा झाला… तुमचा आदेश आला… ताई संघर्ष केलाच पाहिजे… संघर्ष केलाच पाहिजे… मी संघर्ष केला. तुमचा आदेश आला वाडी वस्त्यावरच्या रस्त्यावरचं काय?…. वाडी वस्त्यावर रस्ते पोहोचले… तुमचा आदेश आला शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं त्याचं काय?… शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये विमा पोहोचला, अनुदान पोहोचलं. तुमचा आदेश आला मुलींचा जन्मदर घटतोय त्याचं काय?… बेटी बचाव, बेटी पढावमध्ये मुलींचा जन्मदर वाढवण्याचं काम सुरू आहे. तुमचा आदेश आला आणि ऊस तोडण्याच्या कोत्याला मान देण्याचा प्रयत्न केला गेला… तुमच्या आदेशासाठी अनेकवेळा मी मान खाली घातली आणि तो आदेश ऐकला… पण तुमची मान कधी खाली जाऊ दिली नाही. मी सत्तेच्या मंचावर असेल नाही तर विरोधात असेल, तुम्ही माझ्यावर कधी माया पातळ केली नाही. तुम्ही म्हणालात त्या प्रत्येक लढ्यात तुमच्यासमोर उभे राहिले, कारण माझ्यामागे तुम्ही होतात… आपलं नातंच असं आहे. तुम्ही सांगायचं आणि मी करायचं. आताही तुम्हीही म्हणालात ताई आपली परंपरा जपली पाहिजे. भगवानबाबांच्या भक्तीची आणि मुंडे साहेबांच्या शक्तीची परंपरा… मुंडे साहेबांना दर दसऱ्याला कधी मुंबई तर कधी दिल्ली दिसायची. मला मात्र दसऱ्याला भव्य जनसागरामध्ये केवळ अन् केवळ भगवानबाबांचे आशीर्वाद आणि मुंडे साहेबांची मूर्ती दिसते. आताही तुम्ही सांगितलं मेळावा झाला पाहिजे आणि 15 ऑक्टोबरला भगवान बाबांची भक्ती आणि मुंडे साहेबांची शक्ती या परंपरेसाठी मी येत आहे सावरगाव भगवान भक्ती गड येथे. आपल्या सर्वांची मी वाट पाहत आहे,’ असं भावनिक आवाहन पंकजा यांनी या व्हिडीओतून केलं आहे.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!