लोकाशा न्यूज
स्व . बाळासाहेब ठाकरे यांनी ८० टक्के समाज कारण करण्याचे सूत्र आणि आदेश दिले ज्यात शेतकरी हा तडजोड नसणारा मुद्दा होता आणि आहे , शपथ घेतल्या नंतर कुठला निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला असेल तर तो कर्जमाफी चा आहे . शेतकरी आणि शेती ठाकरे सरकारचा अजेंडा आणि झेंडा आहे . छत्रपती शिवाजी महाराज यांचेच कृषी धोरण महाराष्ट्रात आहे , मात्र केंद्र सरकार ज्या पद्धतीने शेतकरी यांच्या विरोधात वागत आहे त्याचा निषेध करण्यासाठी कुंडलिक खांडे यांनी प्रचंड रैली काढत बंद चे समर्थन केले . व्यापारी व नागरिकांनी देखील यास प्रतिसाद देताना हे ठाकरेंचे आणि शेतकऱ्यांचे राज्य असल्याचे दिल्लीला दाखवून दिले .
राज्यात महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे चार शेतकर्यांच्या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी राज्यव्यापी बंदची हाक दिली होती. लखीमपूर खेरी जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ७० किमी अंतरावर टिकुनिया येथे झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी चार शेतकरी होते. अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असल्या तरी सत्ताधारी पक्षांनीच आवाहन केल्याने बंदला प्रतिसाद मिळाला.शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी दुचाकीवरुन संपुर्ण शहरात फिरुन जनतेला एक दिवस बळीराजासाठी बंद ठेवा असे आवाहन केले होते. जिल्हाप्रमुखांच्या या आवाहनाला बीडकरांनी जोरदार प्रतिसाद देत लखीमपुर हत्याकांडाच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळला.
उत्तर प्रदेशातील लखीमपुर खीरी येथे शेतकरी आंदोलनास पाठिंबा देणयसाठी जमलेल्या शेतकर्यांच्या जमावामध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री आशिष मिश्र याने आपली गाडी घालून चार शेतकरी आंदोलनकाची हत्या केली या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून दि. ११ रोजी महाराष्ट्र बंद चे आवाहन केले होते. शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो शिवसैनिक यांनी रस्त्यावर उतरुन लखीमपुर खीरी घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.जिल्हाप्रमुख खांडे यांनी संपुर्ण शहरात फिरुन व्यापारी वर्गाला विनंती करुन या बंदमध्ये सहकार्य करा, सहभागी व्हा असे आवाहन केले. तसेच या प्रसंगी जनतेला आवाहन करताना जिल्हाप्रमुख खांडे म्हणाले की, लोकांनी उत्स्फूर्तपणे बंद केलाय. बंद १०० टक्के यशस्वी आहे. शेतकरी न्यायाच्या प्रतिक्षेत असून शेतकर्यांना चिरडण्याच्या प्रवृत्तीविरोधात आमचा विरोध आहे. भाजपाला ही सत्तेची मस्ती आहे बाकी काही नाही. कुणाचंही सरकार असो उत्तर प्रदेशमध्ये जी कृती झाली ती निंदाजनक आहे. केंद्र सरकारने भारताच्या नागरिकांना, शेतकर्यांना न्याय द्यावा आणि बळीराजाच्या विरोधात जे काळे कायदे केले आहेत ते त्वरीत मागे घ्यावेत अशी मागणी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह जिल्हा सचिव वैजनाथ नाना तांदळे,जयसिंग मामा चूंगडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख संगीताताई चव्हाण, उपजिल्हाप्रमुख आशिष मस्के,गणेश दादा खांडे, जिल्हा सह सचिव मशरु भाई पठाण, जिल्हा सहसचिव रतन तात्या गुजर, तालुकाप्रमुख गोरख अण्णा सिंघण,तालुका प्रमुख किरण चाव्हण,तालुका समन्वयक रमेश तंबारे, युवानेते तथा सोशल फायटर गणेश उगले,अर्जुन दादा नलावडे,पंजाबराव काकडे,देवराव आबा घोडके,संतोषजी घुमरे,रामसिंग टाक,राजू टाक,शहर प्रमुख सुनिल सूरवसे,कल्याण कवचट,सखाराम देवकर,कामरान शेख, बाबू करांडे,सूरज चूंगडे,राजाभाऊ नवले,रणजित कदम,राहुल साळुंके, तोडकर महलिंग,शंकर अप्पा चाव्हान,दत्ता काशिद,गणेश साळुंके,गणेश भाऊ घोडके,नानासाहेब घाल्लल,बाळासाहेब,गोरख कदम,विकास पिंगळे, नाकटिळक,लहू खांडे,रणजित कागदे,विकास गवते,बालाजी गवते,अंकुश राठोड,राजकुमार धोंडे,विष्णू क्षिरसागर,शिवाजी कोळगुडे, अशपाक शेख,रमेश नाना शिंदे प्रदीप शिंदे, भरत अण्णा मते,योगेश गायकवाड,गणेश डांगे,मसू मोरे, बाळू मोरे,रामभाऊ घोडके,तात्या घोडके,गणेश वळे,श्रीमंत खांडे,ज्ञानेश्वर खांडे, विठल,खांडे,महेश जाधव,विक्की जाधव,तोफेक शेख,अशोक शिंदे,शुभम घोडके, काचरू जाधव यांनी बंदमध्ये सहभागी होत मागणी केली आहे.















