Uncategorized

नवचेतना महिला उद्योग व महिला मल्टीपल निधी बँकेच्या अध्यक्षा मनीषा घुले यांच्याविरुद्ध केज पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल

केज : केज येथील नवचेतना महिला उद्योग व महिला मल्टीपल निधी लिमिटेड बँकेच्या अध्यक्षांनी अधिकाराचा गैरवापर करत सहा लाख चाळीस हजार रुपयांची फसवणूक करत नव चेतनाच्या संचालकांचे बनावट राजीनामे तयार करून ते खरे असल्याचे दर्शवत फिर्यादी व साक्षीदार यांना संचालकांना संचालक मंडळातून कमी केल्याप्रकरणी नवचेतना महिला उद्योग व महिला मल्टीपल निधी लिमिटेड बँकेच्या अध्यक्षा मनीषा घुले विरुद्ध केज पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केज येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा चेतना महिला उद्योग आणि महिला मल्टीपल निधी लिमिटेड बँकेच्या अध्यक्षा मनीषा सिताराम घुले राहणार समता नगर केज यांच्याकडे नवचेतनाच्या संचालिका तथा सामाजिक कार्यकर्त्या ज्योती रामेश्वर सांबरे यांनी दिनांक 26 ऑगस्ट 2019 रोजी व त्यानंतर एक वर्षापूर्वी नवचेतना महिला उद्योग आणि महिला मल्टीपल निधी लिमिटेड बँके केज येथे नव चेतना महिला उद्योगासाठी दोन लाख 40 हजार रुपये व मल्टिपल निधी लिमिटेड बँकेसाठी चार लाख रुपये असे एकूण सहा लाख चाळीस हजार रुपये चेतना महिला उद्योग व नवचेतना महिला मल्टीपल निधी लिमिटेड बँकेच्या अध्यक्षा मनीषा घुले यांच्याकडे जमा केले होते .
ज्योती रामेश्वर सांबरे यांना व साक्षीदार यांना नव चेतना महिला उद्योगाच्या च्या संचालक मंडळात घेण्यात आले होते मात्र नव चेतना महिला उद्योग आणि महिला मल्टीपल निधी लिमिटेड बँकेच्या अध्यक्षा अध्यक्षा मनीषा घुले यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून सामाजिक कार्यकर्त्या ज्योती रामेश्वर सांबरे व साक्षीदार यांना कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता किंवा कोणतीही नोटीस न बजावता त्यांछा नावे बनावट राजीनामा तयार करून त्यावर बनावट सही करून तो खरा म्हणून वापरत ज्योती सांबरे व साक्षीदार यांना संचालक मंडळातून कमी करून एकूण सहा लाख चाळीस हजार रुपयांची फसवणूक करून बघून घेण्याच्या धमक्या दिल्या याप्रकरणी ज्योती रामेश्वर सांबरे यांनी केज पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून केज येथील नऊ चेतना महिला उद्योग व महिला मल्टीपल निधी लिमिटेड बँकेचे अध्यक्षा मनीषा सिताराम घुले राहणार समता नगर केज यांच्याविरुद्ध 491 / 2021 कलम 420465761506 गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे करत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!