ुबीड, दि. 9 (लोकाशा न्यूज) ः शनिवारी बीडच्या एलसीबीने जमिन घोटाळेबाजांना मोठा दणका दिला आहे. आष्टीच्या वक्फ बोर्डाच्या जमिन घोटाळ्याप्रकरणी बडतर्फ अप्पर जिल्हाधिकारी एन.आर. शेळके यास गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतिष वाघ आणि त्यांच्या टिमने शनिवारी औरंगाबादमध्ये बेड्या ठोकल्या आहेत. यामुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
आष्टी तालुक्यातील चिंचपूर येथील जमीन घोटाळयात बडतर्फ करण्यात आलेल्या अप्पर जिल्हाधिकारी एन.आर.शेळकेला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हा शाखेने एन.आर.शेळकेला औरंगाबाद येथून पकडले आहे. वक्फ बोर्डाची जमिन मदतमाश जाहिर करुन भलत्यांच्याच नावे केल्याचा गुन्हा आष्टी पोलीसात दाखल आहे. या प्रकरणात प्रथमच मोठा मासा पोलीसांच्या गळाला लागला आहे. शेळके याच्यावर सेवेत असताना अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. तर बीड जिल्ह्यातील देवस्थान आणि वक्फ जमिनिच्या घोटाळयातील अनेक आदेश शेळकेच्या सहीचे असल्याचे सांगितले जाते.
बीड येथे जिल्हा पुरवठा अधिकारी असताना शेळकेला लाच घेताना अटक करण्यात आली होती. त्यात त्याला नंतर बडतर्फ करण्यात आले होते.