Uncategorized

जिल्ह्यातील प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावा, एसीईओंनी झेडपीच्या सर्व अभियंता आणि उपअभियंत्यांकडून घेतला कामनिहाय आढावा



बीड, दि. 6 (लोकाशा न्यूज) : प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावा, असे स्पष्ट आदेश जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासूदेव सोळंके यांनी झेडपीच्या सर्व अभियंता आणि उपअभियंतांना दिले आहेत. बुधवारी सोळंके यांनी जिल्ह्यातील कामनिहाय आढावा घेतला आहे.
वासूदेव सोळंके यांना जिल्हा परिषदेमधील कामांचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळेच त्यांच्या कामाचा बीड जिल्ह्याला भविष्यात मोठा फायदाच होणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक काम गतीने करण्यासाठीच काल त्यांनी जिल्ह्यातील सर्व अभियंता आणि उपअभियंत्यांची आढावा बैठक घेतली. प्रत्येक काम गतीने करा, प्रलंबित कामे ठेवू नका, पावसाने ज्या ठिकाणच्या कामांची पडझड झाली आहे, त्या कामांची तात्काळ पाहणी करून त्याचा अहवाल सादर करावा, असेही आदेश यावेळी सोळंके यांनी दिले आहेत. एसीईओंनी याच बैठकीत काही जणांचे कानही टोचल्याचे समजते. याबैठकीला बाधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हळीकर यांचीही उपस्थिती होती.

नव्या ईमारतीच्या कामाची सीईओ
आणि एसीईओंनी केली पाहणी
कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या नव्या ईमारतीचे काम पुर्ण करायचे आहे. त्याअनुषंगानेच बुधवारी सकाळी सीईओ अजित पवार आणि एसीईओ वासूदेव सोळंके यांनी नव्या ईमारतीच्या कामाची पाहणी केली, काम पुर्ण होण्यासाठी यावेळी त्या दोघांनीही संबंधित यंत्रणेला कडक आदेश सोडले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!