Uncategorized

एक लाख रुपयांच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

आष्टी – पिकअपचे कर्ज फेडण्यासाठी माहेरून एक लाख रूपये घेऊन ये म्हणून पतीसह सासरच्या लोकांनी विवाहीतेकडे तगादा लावला . माहेरहून ५० हजार रुपये देऊनही उर्वरित रकमेसाठी तिचा सतत छळ केला . अखेर या छळाला कंटाळून त्या विवाहितेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली . याप्रकरणी तिघांवर सात जणांवर आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला . काजल अमोल सांगळे ( वय २० , क हेवाडी , ता . आष्टी ) असे त्या मयत विवाहितेचे नाव आहे . काजलचे वडील मच्छिंद्र नवनाथ आंधळे यांच्या फिर्यादीत म्हटले आहे की , दोन वर्षापुर्वी काजलचा विवाह क – हेवाडी येथील अमोल महादेव सांगळे याच्याशी झाला होता . सुरुवातीचे ३-३ महिने व्यवस्थित गेल्यानंतर तिचा सासरी सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून छळ होऊ लागला . पिकअप साठी घेतलेले उसने पैसे परत करण्यासाठी माहेरहुन एक लाख रुपये घेऊन ये म्हणून मागील सहा महिन्यापासून पती अमोल सांगळे , सासरा महादेव सांगळे , सासू मकाबाई सांगळे , नणंद सुवर्णा गोल्हार , अलका गोल्हार , नंदावा दादासाहेब गोल्हार व गहिनाथ गोल्हार यांनी काजलला शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली . याबाबत माहिती झाल्यानंतर काजलच्या वडिलांनी तिच्या सासरी ५० हजार रुपये दिले . त्यानंतरही उर्वरित रकमेसाठी तिचा छळ सुरूच राहिला , अखेर सततच्या छळास कान्ताळून काजलने सोमवारी ( दि .०४ ) विहिरीत उडी मारून आत्महत्या केली . सदर फिर्यादीवरून काजलच्या पतीसह सात जणांवर आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक सलीम चाऊस हे करीत आहेत .

घातपाताच्या संशयामुळे दुसऱ्या दिवशी केला अंत्यविधी
दरम्यान , काजलचा मृतदेह क – हेवाडी येथील सांगळे यांच्या शेतात मंगळवारी सकाळीच सापडला होता . परंतु माहेरच्या लोकांनी घातपाताचा संशय घेतल्याने तिचा मृतदेह अंबाजोगाई येथील स्वा.रा.ती. रूग्णालयात शवविच्छेदनादासाठी पाठविण्यात आला . बुधवारी शवविच्छेदन झाल्यानंतर आष्टी येथील अमरधाममध्ये पोलिस बंदोबस्तात काजलच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात आले .

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!