Uncategorized

जीएसटी चुकवल्या प्रकरणी बीडमध्ये छापेमारी, चार व्यापारी अडकले !!

जीएसटी चुकवला,चार व्यापाऱ्यांवर छापे !!

बीड – वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी विभागाचे पथक गेल्या दोन दिवसापासून बीडमध्ये तळ ठोकून आहे .या पथकाने शहरातील चार व्यापारी प्रतिष्ठानवर छापे घातले असून तपासणी सुरू आहे .दरम्यान हे पथक या व्यापाऱ्यांच्या शहरातील आणि शहराबाहेरील गोदामांची देखील तपासणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे .

जीएसटी मध्ये चोरी केल्याची माहिती मिळाल्यानंतर जीएसटी विभागाचे पथक मंगळवारी बीडमध्ये दाखल झाले .या पथकाने जुना मोंढा भागातील छाया,अरिहंत, बार्शी रोडवरील रतन आणि जालना रोडवरील बालाजी या व्यापारी प्रतिष्ठान वर दोन दिवस छापेमारी केली .सकाळपासून सुरू झालेली कारवाई दुसऱ्या दिवशी देखील सुरूच होती .

या व्यापाऱ्यांनी करचोरी किंवा कर चुकवेगिरी केल्याची माहिती मिळाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.या ठिकाणी नेमकी काय कारवाई झाली याबाबत माहिती मिळू शकलेली नाही .मात्र या व्यापाऱ्यांचे शहरात आणि शहराबाहेर देखील काही गोदाम आहेत,त्याठिकाणी देखील छापेमारी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे .

लॉक डाऊन च्या काळात दुकान उघडून माल विक्री केल्याप्रकरणी देखील यातील काही व्यापाऱ्यांना दोन चार वेळा दंड झाला होता,तसेच लॉक डाऊन च्या काळात या व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी विक्री केली मात्र त्याचा जीएसटी भरला नाही अशी माहिती विभागाला मिळाली होती,त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे .

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!