Uncategorized

मनोज गुंजाळ यांना एनएसएसचा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार, प्रतिभासंपन्न हरहुन्नरी भूमीपुत्राचा खा. प्रीतमताईंनी केला सन्मान

बीड, जिल्ह्याचे भूमिपुत्र कु. मनोज विष्णू गुंजाळ यांना राष्ट्रपती श्री. रामनाथजी कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

पुरस्कार वितरण समारंभाला मी दिल्लीत नसल्यामुळे आज मुंबईच्या कार्यालयात त्यांचा सन्मान केला व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. मनोज गुंजाळ यांनी आपत्ती व्यवस्थापन, रक्तदान,राष्ट्रीय साहसी शिबिर, जलसंवर्धन, हरितगाव, अवयवदान, प्रौढसाक्षरता, उज्ज्वला योजना अशा राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे.

कोरोना काळात गरजूंना अन्नधान्य वाटप, रक्तदान आणि प्लाज्मादान करण्यास प्रेरित करणे,कोरोना काळात मास्क,सॅनिटायझरसह सामाजिक अंतर राखण्याच्या नियमांचे पालन करण्यासंदर्भात समाजमाध्यमांद्वारे जनजागृती करण्याचे कार्य त्यांनी केले आहे.तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने केलेल्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्यांनी सतरा हजार विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व देखील केले होते.आज या प्रतिभासंपन्न हरहुन्नरी भूमीपुत्राचा सन्मान करताना मनस्वी आनंद झाला, असल्याचे खा. प्रीतमताईंनी म्हटले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!