देश विदेश

​ममता बॅनर्जींच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा, भवानीपूरमधून विक्रमी मतांनी विजय; भाजपच्या प्रियांका पराभूत

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जींच्या(Mamata Banerjee) मुख्यमंत्रीपदाचा (Chief Minister) मार्ग मोकळा झाला आहे. भाजपच्या उमेदवार प्रियांका टिबरेवाल यांचा पराभव झाला आहे. भवानीपूर पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी विजयी झाल्यात. ममता बॅनर्जीयांचा विक्रमी मतांनी विजय झालाय. ममता बॅनर्जी यांनी प्रियंका टिबरेवाल यांचा 58 हजार 832 मतांनी पराभव केला आहे. भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. एकूण 21 राऊंड झाले. त्यानंतर 58 हजार 832 मतांनी ममता बॅनर्जी यांनी विजय मिळवला आहे. पश्चिम बंगालमध्ये एप्रिल-मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा नंदीग्राम मतदारसंघात पराभव झाला. तेव्हा भाजपचे उमेदवार सुवेंदु अधिकारी यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर मुख्यमंत्रिपदावर कायम टिकून राहण्यासाठी ममता यांना 6 महिन्यांच्या आत आमदार होणं गरजेचं होतं. त्यामुळे आजची भवानीपूरची जागा जिंकणं त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. अखेर विधानसभा पोटनिवडणुकीत भवानीपूर मतदारसंघातून त्या विजयी झाल्या आहेत. ममता बॅनर्जी यांनी भाजप उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांचा मोठा फरकाने पराभव केला आहे. टिबरेवाल यांचा 58 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. ममता विजयी झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. या विजयासोबत ममता बॅनर्जी यांनी भवानीपूरमधून हॅटट्रिक मिळवली आहे. ममता बॅनजी यांनी यापूर्वी दोन निवडणुकीत भवानीपूर मतदारसंघातून दोनवेळा विजयी झाल्या होत्या.

भवानीपूरमध्ये झालं होतं सर्वात कमी मतदान
निवडणूक आयोगाच्या मते, भवानीपूरमध्ये 53.32 टक्के मतदान झालं होतं. याशिवाय मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जंगीपूरमध्ये 76.12 टक्के लोकांनी, तर शमशेरगंजमध्ये 78.60 टक्के लोकांनी मतदान केलं होतं. सर्वात कमी मतदान भवानीपूरमध्ये झालं होतं.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!