कडा:- महसूल प्रशासनात एक शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून कोरोनाच्या कालावधीत किती जबाबदारीने कार्यतत्परता दाखवावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे नायब तहसिलदार प्रदिप पांडूळे व नायब तहसिलदार नीलीमा थेऊरकर यांनी दाखवून दिले. त्यामुळे समाजात भोगी नव्हे तर त्यागी माणसं लोकांच्या स्मरणात राहतात. असे प्रतिपादन माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी केले.
आष्टी येथील नायब तहसिलदार प्रदिप पांडूळे व नायब तहसिलदार श्रीमती नीलीमा थेऊरकर यांची प्रशासकीय बदली झाल्यामुळे त्यांना तहसिल कार्यालयाच्या वतीने निरोप समारंभाच्या कार्यक्रमात माजी आ. दरेकर बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्तव्यदक्ष तहसिलदार राजाभाऊ कदम,गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, नायब तहसिलदार श्रीमती शारदा दळवी, नायब तहसिलदार पंढरपुरे, प्रभारी नायब तहसिलदार पांडूरंग माडेकर आदि मान्यवरांसह सत्कारमुर्ती व्यासपीठावर उपस्थित होते.
या सत्कारप्रसंगी बोलतांना माजी आमदार साहेबराव दरेकर म्हणाले की, तहसिल कार्यालय ही तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची माता असून, या ठिकाणी आल्यानंतर सामान्य माणसाचे काम नाही झाले तरी चालेल पण आलेल्या प्रत्येक माणसांना आपुलकीने समजून सांगाण्याची जबाबदारी नायब तहसीलदार प्रदीप पांडूळे व नीलिमा थेऊरकर यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे. कार्यालयात येणा-या एखाद्याला माणसाला कामाची पध्दत समजून सांगून काम करण्यात या दोघांचाही हातखंडा होता. कोरोनाच्या कालखंडात या दोनीही अधिका-यांनी उल्लेखनीय कार्य केले असल्याचे गौरवोदगार काढून दरेकर म्हणाले की, समाजात भोगी नव्हे तर त्यागी माणसं लोकांच्या कायम स्मरणात राहतात. तसेच आपल्या अनुभवाचे काम दुस-या ठिकाणी यशस्वीपणे करतीलच, मात्र भविष्यात हे दोघे ही परत आष्टीत नाही पण जिल्ह्यात तरी यावेत. मराठवाड्याची माणसे प्रेमळ आहेत पण वेळेला काय होते, ते कळत नाही पण आष्टीचे नागरिकही तेवढेच प्रेमळ असल्याचेही माजी आ.साहेबराव दरेकर यांनी सांगीतले. यावेळी तहसिलदार राजाभाऊ कदम म्हणाले की, बदली हा नोकरी करणा-या अधिकारी अन् कर्मचा-यांसाठी अविभाज्य घटक आहे. माझ्या सहकार्यांने जे काही काम केले ख-या अर्थाने उल्लेखनीय केले आहे. मला आष्टीत येऊन एक वर्ष झाले असले तरी या दोघांच्या सहवासात मला कामात सहकार्य लाभले आहे. तहसिलमध्ये आलेल्या माणसाचे काम होते का नाही यापेक्षा माझे काम काय आहे हे विचारणारा कुणी तरी तहसिल कार्यालयात आहे. हे काम या दोघा सहकार्यांने केल्याचे त्यांनी सांगीतले. माजी जि.प.सदस्य विजय गोल्हार, नायब तहसिलदार शारदा दळवी, नायब तहसिलदार पांडूरंग माडेकर, गटविककास अधिकारी सुधाकर मुंडे, प्रा.राम बोडखे, संजय थोरवे, ग्रामसेवक बाळासाहेब थोरवे, नांदूरचे माजी सरपंच संजय विधाते, सचिन भस्मे,दादा घोडके, शिवसंग्रामचे ज्ञानेश्वर चौधरी, काॅग्रेसचे रविंद्र ढोबळे, अॅड.बाळासाहेब झांबरे, नवनाथ विधाते, जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्ञबुद्दे, उत्तम बोडखे, राजेंद्र जैन, गणेश दळवी, प्रविण पोकळे, निसार शेख, जावेद पठाण, डाॅ यशवंत हंबर्डे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते, महसूल विभागाचे कारकून, लेखापाल, मंडळाधिकारी, तलाठी आदी मान्यवर उपस्थित होते. कोरोना नियवलीचे पालन करुन हा निरोप समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला
आष्टीकरांचे प्रेम स्मरणात राहिल.
मागील साडेचारवर्षात मला आष्टीमध्ये नायब तहसिलदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली.या कालावधीत मला निवडणुकीसह इतर सर्वच विषयाची अनुभवाची शिदोरी मिळाली आहे. त्याचा भविष्यात नक्कीच उपयोग होईल. त्यामुळे आष्टीकरांचे प्रेम कायम स्मरणात राहिल.
–निलीमा थेऊरकर, नायब तहसिलदार
मला माझ्याच तालुक्यात काम करण्याचे भाग्य लाभले
पाच वर्षापुर्वी मला बीडनंतर आष्टी तालुक्यात नायब तहसिलदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे सात वर्ष मला माझ्याच तालुक्यात काम करण्याचे भाग्य मिळाले. या कालावधीत सर्वसामान्यांचे प्रेम आणि सहकारी कर्मचा-याचा सहवास यामुळे चांगले काम करण्याची संधी मिळाली.
–प्रदिप पांडूळे,नायब तहसिलदार