Uncategorized

गेवराईत राष्ट्रवादीचाच आमदार होणार – जयंत पाटील,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकून विधानसभेतील पराभवाचा वचपा काढा – धनंजय मुंडे,राष्ट्रवादी परिवार संवादच्या उत्कृष्ट नियोजनासाठी जयंत पाटलांनी विजयसिंह पंडित यांचे केले कौतुक

गेवराई, दि.२७ (प्रतिनिधी) गेवराईची जागा राष्ट्रवादीसाठी महत्वाची असून येणार्या निवडणुकीमध्ये गेवराईत राष्ट्रवादीचाच आमदार होणार असल्याची खात्री राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली. विधानसभेतील पराभावाचा राग मनात असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकून विधानसभेतील पराभवाचा वचपा काढा असे आवाहन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने गेवराई येथे ते बोलत होते. कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल जयंत पाटील यांनी विजयसिंह पंडित यांचे कौतुक केले.

गेवराई तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची दखल घेताना जयंत पाटील म्हणाले की, शेतकर्यांना दिलासा देण्याचे सरकारचे धोरण आहे, लवकरच या भागातील शेतकर्यांना न्याय देण्याचे काम राज्याचे मंत्रीमंडळ करेल असा शब्द यानिमित्ताने देतो. या भागात फुटलेल्या तलावांच्या लवकरच दुरुस्तीचे काम सुरु होईल असे आश्‍वासन त्यांनी यानिमित्ताने दिले. माजी आ.अमरसिंह पंडित व विजयसिंह पंडित यांनी तालुक्यातील नुकसानग्रस्तांना तातडीची मदत करण्याची मागणी या कार्यक्रमात केली होती, त्याची दखल दोन्ही मंत्र्यांनी घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या परिवार संवाद कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, आ.संजय दौंड, माजी आ.अमरसिंह पंडित, जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या सिरसाट, पक्षनिरीक्षक जीवनराव गोरे, माजीमंत्री जयसिंगराव गायकवाड, माजी आ.उषाताई दराडे, महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणाताई सलगर, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, मुंबई बाजार समितीचे सभापती अशोक डक, बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष बजरंग सोनवणे, बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित, अ‍ॅड.हेमाताई पिंपळे, प्रज्ञाताई खोसरे, रेखाताई फड, संगीता तुपसागर, वैशाली पाटील, प्रशांत कवडे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष जयसिंग सोळुंके, सावता परिषदेचे अध्यक्ष कल्याण आखाडे यांच्यासह आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
सोमवारी दुपारी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचे बीड जिल्ह्यात आगमन झाले, गेवराई विधानसभा मतदार संघाचा आढावा जयंत पाटील यांनी घेतला. गेवराईतील कार्यक्रमामध्ये १०० टक्के बुथ कमिटीचे अध्यक्ष उपस्थित राहिल्याचे पाहून त्यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाचे कौतुक केले. बुथ समितीच्या नियमित बैठका घेवून आत्तापासून निवडणुकीची तयारी केल्यास २०२४ मध्ये या मतदार संघात राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. केंद्रातील सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई वाढल्याचे सांगून केंद्र सरकारच्या विरोधात संघर्षाची भुमिका घेण्याचे आवाहन त्यांनी केले. गेवराईने आपले वेगळेपण दाखवले आहे, येथे राष्ट्रवादीची प्रचंड ताकद आहे, विधानसभेतील पराभवाबाबत मतदारांना आता पश्‍चाताप होत आहे. त्यामुळे ही जागा जिंकायचीच असे आवाहन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात केले. नगर परिषदसह जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जिंकण्याचे आवाहन त्यांनी केले.

गेवराईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षाची ताकद अमरसिंह पंडित यांच्या पाठिशी उभी करण्याची मागणी यावेळी केली. लेखाशिर्ष २५१५ सह इतर निधी या मतदार संघात देण्याची मागणी पक्षनिरीक्षक जीवनराव गोरे यांनी केली. पक्ष संघटनेच्या बांधणी बाबत विविध सेलच्या प्रदेशाध्यक्षांनी आढावा घेतला. राष्ट्रवादी युवक काँग्रेस, सकल धनगर समाज, सावता परिषद, बंजारा समाज यांच्यावतीने जयंत पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला गेवराई विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. दिमाखदार व उत्कृष्ट नियोजनाची चर्चा यावेळी झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माधव चाटे यांनी केले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!