बीड / प्रतिनिधी
जे वंचित आहेत त्यांनाच वंचितांच्या वेदना माहीत आहेत. सध्या गृहीत धरले जात असल्याने ओबीसींनी ताकद दाखवावी लागेल. दिल्लीत महिनाभर तळ ठोकून बसण्याची तयारी
ठेवावी लागेल. ओबीसी समाज गेल्या अनेक वर्षापासून आपल्या हक्कासाठी संघर्ष करीत आहे. आता जो ओबीसी की बात करेगा, वही देश पे राज करेगा! असे राज्याचे बहुजन कल्याण मदत व पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी केले. वंचित
समाजातील लोकांना मुख्यमंत्री पदाची संधी का मिळत नाही, असा सवाल करत त्यांना संधी मिळावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
ओबीसी संख्येने अधिक असले तरी विखुरलेले आहेत. आता
आरक्षण टिकविण्यासाठी एकत्रित या असे आवाहन करुन ओबीसींचा सत्तेत सहभाग
वाढला तरच समाजाचे प्रश्न सुटतील असे प्रतिपादन ना. वडेट्टीवार यांनी केले. रविवारी (ता. २६) आरक्षण बचाव निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली सदरील भव्य मेळावा संपन्न होणार आहे. बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, ऑल इंडिया मुस्लिम ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी, माजी आ. नारायणराव मुंडे, ओबीसीच्या ज्येष्ठ नेत्या प्रा. सौ. सुशीलाताई मोराळे, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस प्रवीण घुगे, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय महासचिव प्रा.पी. टी. चव्हाण, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे, महासचिव सचिन राजूरकर, प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रकाश भागरथ, युवा प्रदेशाध्यक्ष चेतन शिंदे, कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष श्याम लेडे, सत्यशोधक ओबीसी परिषदेचे राज्याध्यक्ष संदीप उपरे, माळी महासंघाचे राज्य प्रवक्ता प्रा. लक्ष्मण गुंजाळ, गोल्ला गोलेवार समाज प्रदेशाध्यक्ष नामदेवराव आयलवार, एस. बी. सी. समाज प्रदेशाध्यक्ष शशिकांत आमने, धनगर समाज कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अंकुशराव निर्मळ, धारूरचे माजी नगराध्यक्ष माधवराव निर्मळ, परीट समाजाचे प्रदेशाध्यक्ष गणेश जगताप, भाजपा अल्पसंख्यांक आघाडीचे बीड जिल्हाध्यक्ष जे. डी. शाह, मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष इंजि. विष्णू दादा देवकते, संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती महोत्सवाचे संस्थापक ॲड. संदीप बेदरे, सोनार समाज युवा प्रदेशाध्यक्ष मंगेशराव लोळगे, दादासाहेब मुंडे, नाभिक महामंडळाचे युवराज शिंदे, दलित पॅंथरचे माणिकराव वाघमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती. पाहुण्यांच्या हस्ते मशाल पेटवून मेळाव्यास प्रारंभ झाला.
विजय वडेट्टीवार म्हणाले, अनेकजण सत्तेत
येण्यासाठी ओबीसींचा आधार घेतात; पण मला आयुष्यात काही
स्वत:साठी मिळवायचं नाही. मी आधी सत्तेत आहे आणि या सत्तेचा वापर ओबीसींच्या न्याय हक्कासाठी करीत आहे. ते म्हणाले, १२७ वी घटनादुरुस्ती केली, पण आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपर्यंतच ठेवली. त्यामुळे ओबीसींमध्ये इतरांना सामावून घेऊन आरक्षण देता
येणार नाही. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्जुन दळे यांनी केले. तर उद्घाटकीय भाषण बीड नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी केले. याप्रसंगी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, प्रा. सुशीलाताई मोराळे, माजी आ. नारायणराव मुंडे, प्रा. पी. टी. चव्हाण, जे. डी. शाह
यांची समयोचित भाषणे झाली.
ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी, मंडल आयोगाची प्रभावी अंमलबजावणी करावी, केंद्र सरकारने संविधानाच्या कलम २४३ डी /६ आणि २४३ टी /६ मध्ये सुधारणा करून देशातील सर्व ओबीसींना २७ टक्के राजकीय आरक्षण मिळवून द्यावे या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी आयोजित केलेल्या या मेळाव्यास संबोधित करताना ना. म्हणाले की, आमचा कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. मात्र लाखोचे मिळावे निघून आरक्षण मिळाले नाही. आणि ओबीसी समाजाला फुकट मिळालेले असताना त्या आरक्षणावर गदा आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे. केंद्रात ओबीसीचे जे खासदार आहेत, त्यांनी ओबीसीचा एम्पिरिकल डाटा मिळविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यापेक्षाही जर १२७ वी घटना दुरुस्तीत सुधारणा केली तर ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवून ओबीसी समाजाला त्यांच्या संख्येनुसार आरक्षण मिळू शकते, त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा प्रश्न देखील सुटू शकतो. ओबीसी, व्हीजेएनटी समाजातील समाजातील लोक आजही गुलामगिरीचे जीवन जगत आहेत. ओबीसी समाजाचा बुलंद आवाज स्व. गोपीनाथराव मुंडे असोत की, ना. छगनराव भुजबळ असोत त्यांच्यापासून ते सर्वसामान्य ओबीसी समाजातील नागरिकांपर्यंत संघर्ष सुरूच आहे. बहुरूपी पोलिसाच्या अंगावर खरा पोशाख चढत नाही, जोपर्यंत वासूदेवाचं रूप घेऊन दारोदारी फिरणार्या वासुदेवाचे घर स्लॅबचे होत नाही, जोपर्यंत वाडी तांड्यावरील नागरिकांना पक्के छत मिळत नाही तोपर्यंत ओबीसीचा हा संघर्ष लढा चालूच राहणार आहे. या लढ्यामध्ये आता ओबीसीने जागरूक होऊन आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणे आवश्यक आहे. मी सत्तेत आहे, तिचा हा संघर्ष लढा मी सत्तेसाठी लढत नसून ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढत आहे. तुमच्या सर्वांची साथ आमच्या भुजात बळ भरणारी आहे त्यामुळे आपले समर्थन आमच्या पाठीशी असेच राहू द्या. बीडचे जिल्हाध्यक्ष अर्जुन दळे यांनी अत्यंत सर्वसमावेशक पद्धतीने आजचा अधिवेशन आणि मेळावा आयोजित केला. त्यांच्या पाठीशी आपण सतत उभा राहून ओबीसी समाजाचे प्रश्नांची सोडवणूक करून घ्यावी असेही यावेळी ना. वडेट्टीवार यांनी सांगितले.
चौकट
अठरापगड जातीच्या वेशभूषा मुळे अर्जुन दळे यांचे केले उपस्थितांनी कौतुक!
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बीड जिल्हाध्यक्ष अर्जुन दळे यांनी अत्यंत कल्पकतेने बीडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आज ओबीसी आरक्षण बचाव निर्धार मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात अठरापगड जातीतील नागरिकांनी पारंपारिक वेशभूषा धारण करून मेळाव्यास उपस्थित राहिल्याने बंजारा समाज, वासुदेव समाज, मसणजोगी समाज, पारधी समाज, गोसावी समाज यांची वेशभूषा मेळाव्याचे आकर्षण बनली होती. सुनियोजित पद्धतीने मेळावा यशस्वी पार केल्यामुळे अर्जुन दळे यांचे उपस्थित सर्वच मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील कारकीर्दीस हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या.