Uncategorized

तिघाडी सरकारचा अवमेळ- तरुणांच्या भवितव्याशी खेळ, राज्य सरकारच्या भोंगळ कारभारामुळे सुशिक्षित बेकारांना मनस्ताप सहन करावा लागला- राजेंद्र मस्के


बीड प्रतिनिधी
राज्याच्या आरोग्य विविध पदासाठी भरती प्रकीया सुरु असुन शनिवार आणि रविवारी या स्पर्धा परिक्षा होणार होत्या परंतु शुक्रवारी रात्री 10.00 वाजता या परिक्षा रद्द केल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. राज्यसरकारने परिक्षेच्या 12 तास आगोदर निर्णय घेऊन सर्व परिक्षार्थी विद्यार्थ्यांना अडचनीत टाकले. परिक्षेसाठी हजारो विद्यार्थी प्रवासात होते. तर काही विद्यार्थी परिक्षेच्या शहरात पोहचले होते. परीक्षा रद्द झाल्याने परिक्षार्थी विद्यार्थ्यांना आर्थीक फटका बसलाच शिवाय मनस्तापही सहन करावा लागला. तिघाडी सरकार मधील अवमेळ आणि प्रशासनाचा भोंगळ कारभारा मुळे परिक्षा रद्द करण्याची नामुष्की सरकारवर आली. तर सुशिक्षीत बेकारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली आहे.
राज्यात आरुढ झालेले तीन पक्षाचे सरकार हे जनमताचा कौल डावलुन केवळ स्वार्थी राजकारणासाठी सरकार स्थापन झाले आहे. या सरकार मध्ये समन्वय नाही. गांर्भीयाने सरकार चालवले जात नाही. राज्यातील जनतेच्या हीतासाठी हे सरकार बांधील नाही. कोणत्याही प्रश्नाचे या सरकारला देणे घेणे राहीले नाही. या मुळे या दीड वर्षात राज्यातील जनतेला केवळ संकट सहन करावे लागत आहे. कोणत्याही संकटात हे सरकार जनतेच्या पाठीशी खंबीर पणे उभे नाही. आज आरोग्य विभागाच्या चालु असलेल्या भरती प्रकियेतील अनागोदी कारभारा मुळे सुशिक्षीत बेकारांच्या वाटेला अवहेलना आले आहे. परिक्षा फॉर्म भरण्यापासुन ते परीक्षा देई पर्यंत विद्यार्थ्यांना हजारो रुपये खर्च करावे लागतात. अशा प्रकारे परिक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे आर्थीक नुकसान होते. संताप सहन करावा लागतो. याचे भान राज्य सरकाने घेतले नाही. राज्य सरकारने ही भरती प्रकीया गांर्भीयाने राबवली असती तर ही वाईट वेळ विद्यार्थ्यांवर आली नसती. किमान या पुढे राज्य सरकारने युवकांच्या भवितव्याशी असा नागडा खेळ खेळु नये अन्यथा राज्यातील युवा सरकारला माफ करनार नाही.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!