Uncategorized

व्दारकादास मंत्री बँकेवरही प्रशासक आले, बँकेचे प्रशासक म्हणून जिल्हा उपनिबंधक विश्‍वास देशमुख काम पाहणार


बीड, दि. 25 (लोकाशा न्यूज) : बीडच्या सहकार क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व अशी ओळख असलेल्या सुभाष सारडा यांना सहकार क्षेत्रातच मोठा धक्का बसला आहे. सारडा यांचे प्राबल्य असलेल्या द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेवर अखेर प्रशासकाची नियुक्ती झाली आहे. बीडचे जिल्हा उप निबंधक विश्वास देशमुख यांनी शनिवारी मंत्री बँकेच्या प्रशासक पदाची सूत्रे स्वीकारली आहेत.
बीड जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रावर सुभाष सारडा यांचे वर्चस्व होते. बीड जिल्ह्यातील द्वारकादास नागरी सहकारी बँकेवर अनेक वर्षांपासून सुभाष सारडा यांचे वर्चस्व आहे. मात्र मागच्या काही वर्षात या बँकेसंदर्भाने अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. स्टटयुटरी ऑडिटमध्ये देखील बँकेवर अनेक ताशेरे ओढण्यात आले होते, यासंदर्भाने बँकेची चौकशी कसूर करण्यात आली होती. यासर्व पार्श्वभूमीवर अखेर या बँकेवर प्रशासक नेमण्यात आला आहे. जिल्हा उपनिबंधक विश्वास देशमुख यांना बँकेवर प्रशासक म्हणून नेमण्यात आले आहे. त्यांनी शनिवारीच पदभार घेतलत्याने सुभाष सारडा यांच्यासाठी हा फार मोठा धक्का मानला जात आहे.

ुठेवीदारांनी घाबरून जावू नये,बँकेची परिस्थिती उत्तम
रिझर्व्ह बँकेने प्रशासकी नियुक्तीची कारवाई हि प्रशासकीय अनियमिततांमुळे केली आहे. त्या लवकरच दूर केल्या जातील. बँकेची परिस्थिती उत्तम आहे. त्यामुळे ठेवीदारांनी घाबरून जाऊ नये. लवकरच बँकेवर पुन्हा लोकनियुक्त संचालक मंडळ येईल अशी प्रतिक्रिया प्रशासक विश्वास देशमुख यांनी बोलताना व्यक्त केली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!