Uncategorized

अतिवृष्टीमुळे खरिपातील पिके पाण्यात, शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी आ. नमिता मुंदडा बांधावर,तातडीने मदत देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


अंबाजोगाई : गुरुवारी ( दि .२३ ) रात्री केज , अंबाजोगाई तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे . शेकडो एकर शेती पाण्याखाली आहे . धरणाचे पाणी मोठ्या प्रमाणात नदीत सोडावे लागल्याने नदीला मोठा पूर आला असून नदीकाठच्या शेतातही पाणी घुसून अतोनात नुकसान आहे . आ . नमिता मुंदडा यांनी तातडीने शुक्रवार सकाळपासूनच केज , अंबाजोगाई तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाला प्रत्यक्ष भेटी देऊन नुकसानीचा विस्ताराने आढावा घेणे सुरु केले आहे . केज , अंबाजोगाई , बीड तालुक्यात सध्याची भयंकर पूर परिस्थिती पाहता बीड जिल्ह्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यानां शेतजमीन , शेतीपिकांचे नुकसान झाल्यामुळे प्रती हेक्टर 50 हजार रुपये शासनाने सरसकट मदत करावी व १०० टक्के नुकसान नुकसान झाल्यामुळे १०० टक्के विमा रक्कम देण्याबाबत विमा कंपनीस आदेश द्यावेत व राज्यमार्ग , वस्ती रस्ते , शेती रस्ते , जिल्हा मार्ग , ग्रामीण रस्ते , पांदन रस्ते ल व पुलांचे दुरुस्ती साठी मोठ्या प्रमाणवर निधी उपलब्ध करून द्यावा . तसेच घरांची पडझड झाली आहे त्याबाबत तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत करण्याबाबत आदेश द्यावेत अशी मागणी आ . मुंदडा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे .
आज शुक्रवारी आ . नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की , 23 सप्टेंबरच्या रात्री अतिवृष्टी झाली आहे . नदी , नाल्यात महापूर आला आहे . पुलांवरून पाणी वाहत आहे . केज , कळंब , भूम , वाशी , चौसाळा , नेकनूर , भागात अतिवृष्टी झाल्यामुळे मांजरा नदीला महापूर आला आहे . मांजरा प्रकल्पाचे दरवाजे उघडले आहेत . परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे धरणाच्या वरील गावांतील शेतीत पाणी शिरले आहे . त्यामुळे शेतजमिनीचे व सोयाबीन , ऊस व इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे . तसेच मांजरा प्रकल्पाच्या खाली मांजरा नदीस अतिवृष्टीमुळे व मांजरा प्रकल्पातील पाणी सोडल्यामुळे महापूर आला आहे . त्यामुळे शेतजमिनीचे व शेतातील पिकांचे सोयाबीन , ऊस व खरीप हंगामातील सर्व पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे . त्याच प्रमाणे केज , अंबाजोगाई , बीड तालुक्यात पडलेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यतील इतर सर्व नद्यांना महापूर आला आहे . सदरील नद्यांचे पाणी मांजरा प्रकल्पात व मांजरा नदी प्रवाहात जाते . परंतु आधीच मांजरा नदीला महापूर आल्यामुळे बाकीच्या नदीचे पाणी पात्रात घुसू दिले जात नाही सदर पाणी परत शेतीत घुसले आहे . त्यामुळे शेतजमिनीचे व पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे . तसेच अंजनपूर , कानडीबोरगाव , बॅरेजचे दोन गेटचे नुकसान झाले आहे .

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!