अंबाजोगाई, दि. २१ (प्रतिनिधी) धनेगाव धरण काठोकाठ भरल्याने मंगळवारी (दि.२१) केज मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी धरणातील पाण्याचे जलपूजन केले. धरण जरी भरले असले तरी, पाण्याच्या बचतीसाठी शेतकऱ्यांसह नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा. असे आवाहन आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी या वेळी केले. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात धनेगांव येथे असलेल्या मांजरा धरणातून अंबाजोगाई, लातूर, केज, कळंब, धारूर या मोठ्या शहरांसह इतर खेड्यांना पिण्याचे पाणी पुरवठा करणारे मांजरा धरण मंगळवारी ९९ टक्के भरले. या धरणातून लातूर बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतीलाही सिंचन होते. अशा या धरणाच्या पाण्याचे जलपूनज आमदार नमिता मुंदडा व अक्षय मुंदडा यांच्या हस्ते झाले. यावेळी दिलीप भिसे, कार्यकारी अभियंता रोहित जगताप, श्रेणी एक अभियंता अभिजित नेकनुरे, शाखा अभियंता शाहुराज पाटील, नगरसेविका उज्वला पाथरकर, कांचन तौर, दिलीप भिसे,मधुकर कचगुंडे,शेख रहीम,सारंग पुजारी,खालील मौलाना,शेख ताहेर,नुर पटेल,महादेव सुर्यवंशी,प्रशांत आदनाक,वैजनाथ देशमुख,संतोष लोमटे,दिलीप पाटील,राहुल खोडसे,अनंत अरसुडे,अमित जाजू,गोपाळ मस्के, यांच्यासह धनेगावचे सरपंच, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नंदकिशोर मुंदडा यांचेही भाषण झाले. आता पाणी उपलब्ध झाले तर, विजेची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी विज बील भरून महावितरणलाही सहकार्य करण्याची गरज आहे. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत होऊ शकेल.असे आवाहन नंदकिशोर मुंदडा यांनी केले.———-कालव्यात सोडले पाणी
धनेगाव धरण काठोकाठ भरल्याने, पाणी पातळी नियंत्रीत ठेवण्यासाठी धरणात येणाऱ्या पाण्याचा फ्लो लक्षात घेता, तेवढेच पाणी पुढे नदीत सोडण्याऐवजी कालव्यात सोडण्याच्या सुचना आहेत. त्यानुसार आमदार मुंदडा यांच्या हस्ते उजव्या कालव्याचे गेट ७ सेंटी मिटरने खुले करण्यात आले. सध्या या कालव्यात प्रति सेकंदास दोन घन मीटर पाणी कालव्यात सोडले जात आहे.