Uncategorized

दत्तात्रय गिरी कार्यमुक्त आता झेडपीच्या ग्रामपंचायत विभागाचा पदभार काकडेंकडे


बीड, दि. 21 (लोकाशा न्यूज) : जिल्हा परिषदेच्या ग्राम पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी यांची लातूर झेडपीत बदली झालेली आहे. त्यानुसार ते बीड जिल्हा परिषदेमधून मंगळवारी कार्यमुक्त झाले, बीड जिल्ह्यात त्यांनी 25 महिण्याचा कार्यकाळ पूर्ण केला, या काळात जिल्हा परिषदमधील  मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व विभागांचे सहकारी अधिकारी, गट विकास अधिकारी व सर्व पदाधिकार्‍यांनी गिरी यांना मोठे सहकार्य केले, पंचायत विभागाचे सर्व कर्मचार्‍यांनी केलेले परिश्रम ,ग्रामसेवक वर्गाचे सहकार्य यामुळे गिरी यांचा कार्यकाळ व्यवस्थित पार पडला,  बीड मधील सर्व सरपंच व ग्रामीण जनता  चांगल्या कामास नेहमीच पाठबळ देणारी आहे याचा प्रत्यय त्यांना आला,बीड जिल्ह्यातून जाताना निश्चितच वाईट वाटत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान त्यांच्यानंतर आता बीड झेडपीच्या ग्राम पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार सीईओ अजित पवार यांनी स्वच्छता विभागाचे प्रदिप काकडे यांच्याकडे सोपविला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!