Uncategorized

उघड्यावर भरणार्‍या व धोकादायक जि.प.शाळांच्या बांधकामासाठी साडेसात कोटींचा निधी, आ.संदिप भैय्या क्षीरसागरांच्या प्रयत्नांना मोठे यश, शहरी ग्रामीण भागातील शैक्षणिक सुविधेला मिळणार गती

बीड (प्रतिनिधी):- बीड विधानसभा क्षेत्रातील अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळांना वर्ग खोल्या नसल्याने उघड्यावर विद्यार्थ्यांना शिकवले जाते तर काही ठिकाणी धोकादायक असलेल्या निजामकालीन जि.प.च्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसवले जाते. याबाबत आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी मागील हिवाळी अधिवेशनात याबाबत आवाज उठवला, तारांकित प्रश्न उपस्थित केला. यानंतर याची शासनाने दखल घेतली असून उघड्यावर भरणार्‍या व धोकादायक असलेल्या जि.प.च्या वर्गखोल्या बांधकामासाठी साडेसात कोटींचा निधी बीड विधानसभा क्षेत्रातील शाळांना मिळाला आहे. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नांना यश आल्याने शिक्षक प्रेमींकडून त्यांचे आभार मानले जात आहे.

बीड विधानसभा क्षेत्रातील बीड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 402 च्या जवळपास जि.प.प्रा.शाळा आहेत. त्यातील 64 शाळांना वर्ग खोल्या नसल्याने उघड्यावर विद्यार्थी बसवले जातात. तसेच 109 जि.प.शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या असून निजामकालीन असल्याने त्या धोकादायक झाल्या आहेत. तसेच 64 ठिकाणी स्वच्छतागृह व मुलभूत सुविधा नाहीत. याबाबत आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी मागील हिवाळी अधिवेशनात आवाज उठवला, तारांकित प्रश्नही उपस्थित केला. त्यानंतर बीड विधानसभा क्षेत्रातील व जिल्ह्यातीलच सर्व शाळांची माहिती शासनाने मागवून घेतली. यानंतर जि.प.शाळांच्या वर्गखोल्यांसाठी, दुरूस्त्यांसाठी निधी मिळावा याबाबत आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांचा सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा सुरू राहिला. आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या सातत्याने सुरू असलेल्या पाठपुराव्यानंतर बीड विधानसभा क्षेत्रातील जि.प.शाळांच्या वर्गखोल्यासाठी ज्यामध्ये निजामकालीन शाळा, मोडकळीस आलेल्या शाळा, दुरूस्ती आवश्यक असलेल्या शाळा यांचा यामध्ये समावेश असून यासाठी साडेसात कोटींचा निधी मिळालेला आहे. लवकरच या जि.प.शाळांच्या वर्गखोल्यांसाठी पुढील कार्यवाही जिल्हा परिषद प्रशासन हाती घेणार असून याबाबतही आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांचा पाठपुरावा दिसून येत आहे.

चौकट
उर्दु मुला-मुलींच्या शाळांचाही होणार कायापालट
बीड शहरातील दोन ठिकाणी उर्दु माध्यमांची दोन ठिकाणी शाळा आहे. यामध्ये केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमांतर्गत उर्दु जि.प.कन्या शाळा मुलांची व मुलींची या ठिकाणी देखिल दीड कोटींच्या आसपास सुविधा पुरविल्या जाणार आहे. यामध्ये डिजीटल क्लास, ग्रंथालय, संगणक लॅब, स्वच्छता गृह व इतर सुविधांचा समावेश असणार आहे. ही सर्व कामे दर्जेदार व्हावेत, आपल्या मतदार संघातील, शहरातील उर्दु माध्यमातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेता यावे यासाठी देखिल आ.संदिप भैय्या प्रयत्नशिल असल्याचे दिसून येत आहे.
चौकट
अशोकनगर हिवरापहाडी शाळा होणार मॉडेल स्कुल
आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून बीड विधानसभा क्षेत्रातील निजामकालीन व उघड्यावर भरणार्‍या जि.प.च्या वर्गखोल्यासाठी जवळपास साडेसात कोटींचा निधी मिळाला आहे. उर्दु शाळांचाही कायापालट होत असतांना अशोकनगर येथील जि.प.शाळेसाठी 60 लक्ष तर हिवरापहाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मॉडेल स्कुल बनवण्यासाठी 1 कोटी रूपयांचा निधी मिळणार आहे. याबाबतही आ.संदिप भैय्या क्षीरसागर सातत्याने प्रयत्न करत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!