Uncategorized

शालेय विद्यार्थिनीचा पर्यावरणाचे महत्व सांगणारा इकोफ्रेंडली गणपती बाप्पा, गणपतीच्या आकारात कुंडी तयार करून लावले झाड


बीड, प्रतिनिधी :- शहरातील गणेश नगर इथे राहणाऱ्या ईश्वरी दत्ता सिरसाट या विद्यार्थिनीने परस बागेत झाडाच्या कुंडीच्या आकारात इकोफ्रेंडली गणपती बसवला. यात ईश्वराने झाड लावले असून तिच्या कल्पकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या बहुतांश गणेश मूर्तीमध्ये केमिकल आणि रसायन असते. अशा मूर्ती नदीत, विहिरीत विसर्जित करण्यात येतात. यामुळे मोठे प्रदूषण होते. पर्यावरणाची हानी होते. प्रदूषण टाळण्यासाठी आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या ईश्वरी दत्ता सिरसाट या मुलीने घरातील परस बागेत प्लास्टिक कॅनची गणेशाच्या मुखाची आकर्षक कुंडी बनवली. या इकोफ्रेंडली गणेशच्या कुंडीत ईश्वरी हिने झाड लावले आहे. या अनोख्या गणेशाचे विसर्जन न करता ईश्वरी झाडाला वर्षभर जोपासणार आहे. गणपती बाप्पाच्या उत्सवात इकोफ्रेंडली गणपती स्थापन करून ईश्वरी हिने पर्यावरनाचे महत्वही पटवून दिले आहे. तिच्या गणेश बाप्पाना पाहण्यासाठी परिसरातील महिला व मुलांची गर्दी होत असून ईश्वरीच्या कल्पकतेचे कौतुक होत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!