Uncategorized

पंकजाताई मुंडेंच्या फोनमुळे ‘त्या’ बालकांवर मुंबईत झाली यशस्वी हृदय शस्त्रक्रिया,माता-पित्यांनी सद्गगित भावनेने व्यक्त केली कृतज्ञता !

परळी । दिनांक १९।
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या फोनमुळे सिरसाळ्यातील मुस्लिम बांधवाच्या बालकांवर मुंबईच्या नामांकित हाॅस्पीटलमध्ये नुकतीच हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. सदर बालकांवर उपचार सुरू करण्यापासून ते शस्त्रक्रिया होईपर्यंत बहुमोलाची मदत केल्याबद्दल त्या बालकाच्या माता-पित्यांनी सद्गगित भावनेने पंकजाताईंची कृतज्ञता व्यक्त केली.

सिरसाळा ता. परळी येथील मोईज पठाण या कार्यकर्त्याचे जवळचे नातेवाईक जावेद शेख यांचा मुलगा (वय ६ ) अबुजर याच्या ह्रदयाला छिद्र होते आणि त्यावर शस्त्रक्रिया करण्याची खूप गरज होती. डाॅक्टरांनी त्याच्या कुटुंबाला मुंबईच्या एसआरसीसी चिल्ड्रन्स हाॅस्पीटलमध्ये भरती होण्याचा सल्ला दिला. मोईज पठाण हे त्या बालकाला व त्याच्या आई-वडिलांना दोन महिन्यांपूर्वी मुंबईत घेऊन गेले होते. रूग्णालयात गेल्यावर मोईज यांनी पंकजाताई मुंडे यांना फोन करून सर्व हकीकत सांगितली. पंकजाताईंनी लगेचच हाॅस्पीटल प्रशासनाला फोन करून ‘त्या’ बालकास दाखल करून उपचार सुरू करण्यास सांगितले. काही दिवसांपूर्वी हाॅस्पीटलने त्याचेवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया केली आणि यातून तो पूर्णपणे बरा झाला. आता त्याची प्रकृती चांगली आहे. “पंकजाताई देवासारख्या धावून आल्यामुळे आमचा मुलगा संकटातून बाहेर येऊ शकला” अशा शब्दांत कृतज्ञतेचे भाव व्यक्त करत अबुजरच्या माता-पित्यांनी त्यांचे मनापासून आभार मानले.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!