परळी दि. १७ — कन्हेरवाडी येथील
सरस्वतीबाई रघुनाथराव मुंडे यांच्या दुःखद निधनाबद्दल भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी शोक व्यक्त केला असून प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डाॅ. तात्याराव लहाने व मुंडे कुटुंबियांचे त्यांनी सात्वंन केले आहे.
सरस्वतीबाई मुंडे यांना गुरूवारी
रात्री ११.३० वाजता देवाज्ञा झाली. मृत्यूबरोबर त्यांनी पंधरा महिने झुंज दिली, पण अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डाॅ. तात्याराव लहाने यांच्या त्या सासू होत्या. एक कुटुंबवत्सल, धार्मिक वृत्तीच्या आणि प्रत्येकांच्या सुख-दुःखात सहभागी होणाऱ्या सरस्वतीबाईंच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशा शब्दांत पंकजाताई मुंडे यांनी शोक भावना व्यक्त केल्या आहेत.