Uncategorized

बीड भाजपा तर्फे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या मुलमंत्राला मोदींजींनी प्रतिष्ठा दिली- खा.डॉ. प्रितमताई मुंडे, लोकशाही राजकारणात मोदींचे महापर्व ऐतिहासीक ठरले- राजेंद्र मस्के


बीड प्रतिनिधी,
देशाचा ‘प्रधानसेवक’ म्हणून जनसामान्यांची संपूर्ण समर्पणाने सेवा करणाऱ्या व्यक्तीचा वाढदिवस साजरा करताना भारतीय जनता पक्षाने केंद्र सरकारच्या विविध योजनेतील लाभार्थ्यांचा सन्मान करून आजचा दिवस खऱ्या अर्थाने सार्थकी ठरवला आहे.आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ‘सबका साथ,सबका विकास,सबका विश्वास’ या मूलमंत्राला प्रतिष्ठा मिळवून देताना जनसामान्यांच्या उत्थानासाठी अनेक योजना राबवल्या आहेत.
आज मोदीजी यांचा ७१ वा वाढदिवस साजरा करत असताना हा मंत्र केवळ राजकीय घोषवाक्य म्हणून मर्यादित राहिला नसून संपूर्ण देशासाठी एक दूरदर्शी आणि धोरणात्मक योजना म्हणून पुढे आला आहे.
देशातील शेवटच्या घटकाला न्याय देण्याचे त्यांचे कार्य असेच अविरत चालत राहो आणि आम्हा कार्यकर्त्यांना यामाध्यमातून सर्वसामान्यांची सेवा आणि सन्मान करण्याची संधी मिळत राहो अशी प्रार्थना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांच्या वाढदिवसा निमित्त बीड च्या लोकप्रिय खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केली.
लोकशाही राजकारणात मोदींचे महापर्व ऐतिहासीक ठरले- राजेंद्र मस्के.
या वेळी बोलताना राजेंद्र मस्के म्हणाले की, लोकशाही राजकारणात गेली अनेक वर्षा पासून मा.नरेंद्र मोदीजी भारतीय राजकारणात सक्रीय आहेत. आज देशाचे पंतप्रधान म्हणुन त्यांचा कारभार लोक कल्याणकारी ठरला आहे. शेतकरी, महीला, वंचीत, गोरगरीब समाजातील प्रत्येक घटकांसाठी समाज उपयोगी योजना राबवून भारतीय नागरीकांना समृद्ध जीवनाचा मार्ग दाखवला मागील पन्नास वर्षात जी प्रगती देशाला साधता आली नाही ती प्रगती आज या सात वर्षात मोदीजींनी करून दाखवली. जागतिक कोरोना महामारी वर मात करण्यासाठी त्याच्या नेतृत्वाखाली लढा दिला. आज देशातील प्रत्येक नागरीकाला कोरोना मोफत लस त्याच्या धोरणात्मक निर्णनयामुळे प्राप्त झाली आहे. जन आरोग्य सुरक्षा बरोबरच अंतर्गत सुरक्षा कायम ठेवुन देशाची सीमा सुरक्षीत ठेवण्याच काम मोदीजींनी केले आहे. प्रखर राष्ट्रवाद कायम ठेवून सुरक्षीत अखंड भारत व आत्मनिर्भर भारताची संकल्पना मुर्त स्वरुपात आणुन भारतीय लोकशाहीच्या राजकारणामध्ये त्यांचे महापर्व ऐतिहासीक ठरले आहे. मोदींजी सारखा प्रामाणीक भ्रष्टाचार मुक्त व देशाला स्वाभीमानाने पुढे नेणारा पंतप्रधान लाभला हे आम्हा भारतींयाचे भाग्य आहे. अशा कर्तृत्व संपन्न देशप्रेमी पंतप्रधानाला बीड जिल्हा भारतीय जनता पार्टी तर्फे सलाम !
भारतीय जनता पार्टीचे जिल्हध्यक्ष यांच्या संकल्पनेतुन आज संघर्षयोद्धा भाजपा जनसंपर्क कार्यालय कॅनॉल रोड बीड येथे जगातील सर्वाधीक लोकप्रियनेते देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस आज बीड जिल्हा भाजपा तर्फे लाभार्थी सन्मान दिवस म्हणुन साजरा करण्यात आला. लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या लोकप्रिय खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते व मा.जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या उपस्थितीत केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत योजना, उज्वला गॅस योजना, शेतकरी सन्मान योजना, मोफत अन्न धान्य योजन, मोफत लसीकरण, पिक विमा योजना, आयुष्यमान भारत योजना, आदि योजनेतील लाभार्थींना सन्मानपत्र व लाडु देऊन वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी ॲड.सर्जेराव तांदळे, विजय गोलार, विजय कुमार पालसिंगन, प्रा.नागरगोजे सर, उशाताई मुंडे, भगीरथ बियानी, सलीम जहागीर, शंकर देशमुख, हजारे विक्रांत, डॉ.जाधव, शांतीनाथ डोरले, संग्राम बांगर, किरण बांगर, शिवाजी मुंडे, प्रमोद रामदासी, संगीता धसे, सुनील मिसाळ, बालाजी पवार, मधुसुदन खेडकर, पोपट शेंडगे, कृष्णा तिडके, भुषण पवार, अनिल चांदणे, कपील सौदा, विलास बामने, नरेश पवार, हरीष खाडे, वसंत गुंदेकर, बाळासाहेब वायभट, रामा बांड, रवी गंगावणे, रविंद्र कळसाने, शरद बडगे, शरद झोडगे, शरद नवले, शरद बहीरवाळ, बंडु मस्के, अनिल शेळके, संजय नलवडे, शहाजी गायकवाड, राकेश बिराजदार, ईरशाद भाई, दिनेश डेंगे, समीरभाई, मीरा गांधले, संध्या राजपुत, लता बुंदेले, शीतल राजपुत, छाया मिसाळ, लता मस्के, लता राऊत, संजीवनी राऊत, कृष्णा बहिरवाळ, संजय काळे, पंकज धांडे, मनोज ठाणगे, विठ्ठल ठोकळ, बाबुलाल डोरमारे, महेश सावंत, लाला पन्हाळे, बालासाहेब मुंडे, विनायक मुंडे, कल्याण पवार, अजय ढाकणे, सतिष कळसुले, बाबुराव कदम, सुग्रीव डोके, व शक्तीकेंद्र प्रमुख व बुथ प्रमुख पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते बहु संख्येने उपस्थितीत होते.
यावेळी अडॅ.सर्जेराव तांदळे, सलीम जहागीर यांनी समयोचीत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुत्र संचलन प्रा.नागरगोजे यांनी केले तर आभार प्रदर्शन शांतीनाथ डोरले यांनी केले.
चौकट- खा.डॉ.प्रितमताई यांचे बीड येथे आगमन झाल्यानंतर मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्त्यासह जिजामाता उद्यान येथील हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन. शहीद हुतात्म्यांना अभिवादन केले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!