Uncategorized

बनावट कागदपत्रे तयार करून रोजगार हमीचे ३ लाख हडपले; दोघांवर पोलिसात गुन्हा,अंबाजोगाई तालुक्यातील उमराई येथील प्रकार

धारूर/प्रतिनिधी:
बनावट कागदपत्रे तयार करून महात्मा गांधी रोजगार हमीचे ३ लाख ३३ हजार ७५४ रुपये परस्पर उचलल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील उमराई येथे घडली. याप्रकरणी कॉम्प्युटर ऑपरेटर व ग्राम रोजगार सेवकावर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील उमराई येथील शिवाजी दगडू केंद्रे (वय ४२) यांना ग्रामपंचायत चे कॉम्प्युटर ऑपरेटर व ग्राम रोजगार सेवक यांनी तुम्हाला तुमच्या शेतात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर मिळवून देतो. असे म्हणून त्यांच्याकडून सातबारा, आधार कार्ड, नमुना आठ-अ फॉर्म व फोटो घेऊन त्या कागदपत्रांच्या आधारे बनावट कागदपत्रे तयार केली. विहीर कामकाजाच्या हजेरी मास्टर चे बनावट झेरॉक्स कॉपी काढून बिल उचलले व साक्षीदार लोकांचे बनावट खाते क्रमांक उघडून त्यावर महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे मजूर दाखवून त्यांचे पण खोटे बँक खाते खोलून अंदाजे ३ लाख ३३ हजार ७५४ रुपये परस्पर हडप केले. तसेच कागदपत्रे बनावट तयार करून शासनाची फसवणूक केली. सदरील घटना सन २०१७ पासून ते १५ सप्टेंबर २०२१ च्या दरम्यान घडली. याप्रकरणी शेतकरी शिवाजी दगडू केंद्रे यांच्या फिर्यादीवरून धारूर पोलीस ठाण्यात ग्रामपंचायतचे कॉम्प्युटर ऑपरेटर नितीन जनार्दन केंद्रे ( वय ३०) व ग्राम रोजगार सेवक भास्कर ज्ञानोबा फुंदे ( वय ३२) यांच्याविरुद्ध गुरनं २००/ २०२१ कलम ४०६, ४०९, ४२०, ४६५, ४६८, ४७०, ४७१, ३४ भादवि नुसार गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भालेराव करीत आहेत

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!