Uncategorized

कोल्हापूर पूरपरीस्थीतीच्या धर्तीवर बीड जिल्ह्यातील शेतक-यांना मदत करा,पिकविमा प्रकरणी 2017 – 18 चा बीड पॅटर्न राबवा – खासदार प्रीतमताई

माजलगाव, दि. 16 प्रतिनिधी: मागील आठ दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील शेतक-यांचे मोठे नुकसान झाले असुन जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांनी दि. 15 सप्टेंबर रोजी या नुकसानग्रस्त, पुरग्रस्त पिकांची पाहणी करत शेतक-यांशी संवाद साधला.
यावेळी खा. प्रितम मुंडे म्हणाल्या की, शेतक-यांच्या हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला आहे. त्यामुळे शेतक-यांचे आतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतक-यांना कोल्हापूरच्या पूरपरिस्थितीच्या धर्तीवर शासनाने मदत करण्याची गरज आहे तर विमा कंपनी ऑनलाईन तक्रार करण्याचा फतवा काढत शेतक-यांना परेशान करत आहे. त्यामुळे सण 2017 – 18 यावर्षी राबविलेला बीड पॅटर्न राबवाण्याची गरज असल्याचे सांगीतले. यावेळी त्यांच्यासमवेत तालुकाध्यक्ष अरूण राउत, बबनराव सोळंके, अशोक तिडके, भगवान सरवदे, राजेश साळवे, हनुमान कदम, माणिक दळवे, अनंतराव जगताप, खयुम पठाण, सुधाकर उफाडे, छबन घाडगे, बाळासाहेब क्षिरसागर, आजुभाई पठाण, संतोष जाधव, आसराम जावळे, नितीन घायतिडक, महादेव फपाळ, धनंजय शिंदे यांची उपस्थिती होती. भेटीदरम्यान खतगव्हाण येथे खा. प्रितमताई यांनी अर्जुन पायघन, दत्ता तसनुसे, जनार्दन पायघन, सुनिल बुरंगे यांच्या कापुस व पपईचे नुकसान पाहणी केली. डाकेपिंप्री फाटा येथे सुखदेव डाके, गोपाळराव डाके, सिध्देश्वर डाके, अशोक डाके, मोगरा येथे बाळासाहेब सातपुते, प्रकाश खिस्ते, उध्दव धुमाळ, गिन्यानदेव राठोड, शंकर जाधव, अरूण गोसावी यांनी निवेदन दिले. शुक्लतिर्थ लिंबगाव येथे गावक-यांशी संवाद साधला यावेळी किसनराव वगरे, बाबा हंडे, बळी वगरे, दादासाहेब चव्हाण व हांडे साहेब व ग्रामस्थ उपस्थित होते. सुरूमगाव सचिन गुळबिले, रंजीत जोगडे, संतोष नायबळ, गंगामसला फाटा येथे निवेदन देतांना मा. पं. स. सदस्य श्रीकृष्ण सोळंके, सरपंच भालचंद्र सोळंके, उपसरपंच अभिजतीत सोळंके, राहुल सोळंके, मोठेवाडी येथे दत्ता चव्हाण, विद्या सागर करपे, फुलचंद नाईकवाडे, विकास गोरे, आबेगाव फाटा येथे प्रमोद शेजुळ, मनोज शेजुळ, बोरगाव फाटा येथे सरपंच शशिकांत जाधव, बुथप्रमुख विठ्ठल जाधव, ज्ञानेश्वर जाधव, सांडस चिंचोली पुरग्रस्तांशी संवाद साधतांना संपुर्ण जनसमुदायासमोर भाषण करतांना खा. प्रितमताई यांनी शासन दरबारी कायमस्वरूप पुनर्वसन करण्यासाठी मुख्यमंत्री व महसुलमंत्र्यांना भेटणार असल्याचे सांगीतले. यावेळी सरपंच अशोक कदम, हरी चंदनशिव, नारायण शेजुळ, महेश भोसले, अशोक उंबरे, दिलीप उंबरे, नागडगाव येथे अजित होळकर, विजय खामकर, रोषणपुरी येथे मृत्यु पावलेल्या मयताच्या घरी भेट दिली. यावेळी उध्दव ताकट, बालासाहेब डांगे, उत्तम डांगे, निवृत्ती डांगे, शिंपेटाकळी येथे नागडगाव बंधा-याच्या पुरामुळे 300 एकर जमिनीचे नुकसान झाले असुन निवेदन देतांना रतन कुंडकर, जीवनताटे, लक्ष्मण राउत, रमेश राउत, बाळु कुंडकर, प्रल्हाद कुंडकर यांची उपस्थिती होती. दरम्यान तपोरत्न प्रभु पंडीताराध्य चंद्रशेखर महाराजांचे निधन झाले. मठात सांत्वनपर भेट व समाधीस्थळाचे दर्शन प्रितमताईंनी घेतले. यावेळी ईश्वर खुर्पे, मन्मथ लांडगे, बाळु लांडगे यांची उपस्थिती होती. राजेवाडी येथे पुरात वाहून जावून मृत्यु झालेल्या पोटभरे कुटूंबांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी साहेबराव आवाड, दिपक महागोविंद, हरिभाउ नवले, जालींदर देळेकर उपस्थित होते. मोगरा येथे माजलगाव धरणाला वसंतराव नाइक जलाशय असे नामकर करण्याचे निवेदन देतण्यात आले. यावेळी शरद पवार, संजय पवार, गणेश चव्हाण यांची उपस्थिती होती.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!