Uncategorized

ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश सर्व निवडणुकीसाठी लागू होईल याची खात्री सरकार देईल का?

मुंबई ।दिनांक १५।
ओबीसींच्या आरक्षणाचा अध्यादेश काढण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाने कांही अंशी न्याय मिळेल पण कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी आणखी खंबीर पावले उचलावी लागतील, तथापि हा अध्यादेश सर्व निवडणुकीसाठी लागू होईल याची खात्री सरकार देईल का? असं ट्विट भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केलं आहे.

राज्य मंत्रिमंडळाने आज ओबीसींच्या आरक्षणावर अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे. यावर ट्विट करतांना पंकजाताई मुंडे यांनी म्हटलं आहे की,ओबीसी आरक्षणाचा विषय हाताळताना अध्यादेश काढण्यात येईल असे ठरले..त्यामुळे ‘ देर आये दुरुस्त आये’ असे म्हणता येईल.. अध्यादेश काढून काही अंशी न्याय मिळेल पण कायम स्वरूपी उपाय करण्यासाठी आणखी खंबीर पावलं उचलावी लागतील ती ही वेळेत !!
सर्व निवडणुकीसाठी अध्यादेश लागु होईल याची खात्री सरकार देईल का? आता लागलेल्या निवडणुकीत लागू होईल का ??.. ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत व्हावे ही काळाची गरज आहे असेही त्यांनी म्हटलं आहे.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!