Uncategorized

खा. प्रितमताई मुंडेंच्या उपस्थितीत परळीत उद्या भाजपचे आंदोलन,ओबीसींचे आरक्षण घालवणाऱ्या राज्य सरकारचा करणार निषेध

परळी ।दिनांक १४।
ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालविणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी तर्फे उद्या १५ सप्टेंबर रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येणार असून उद्या खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत परळीत हे आंदोलन होणार आहे.

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा.डॉ प्रीतमताई मुंडे यांच्या
मार्गदर्शनाखाली उद्या संपूर्ण जिल्हाभरात आंदोलन करण्यात येणार आहे. परळी तहसील कार्यालयासमोर सकाळी 11 वा. भाजपच्या वतीने आंदोलन करून राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात येणार आहे. या आंदोलनात सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी केले आहे.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!