Uncategorized

शेतकऱ्यांच्या वेदना जाणाऱ्या खा. प्रीतमताई उद्यापासून बांधावर ! आष्टी, शिरूर, माजलगाव, परळी आणि गेवराई तालुक्यातील 32 गावांना भेटी देऊन नुकसानीची करणार पाहणी


बीड (प्रतिनिधी):- भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा शेतकऱ्यांच्या वेदना जाणाऱ्या नेत्या खा.प्रितमताई मुंडे ह्या उद्या दि.14 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात येत आहेत. आठवडाभरापुर्वी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची त्या पाहणी करणार आहेत. उद्या दिवसभर आष्टी आणि शिरूर तालुक्यातील गावांना त्या भेटी देणार आहेत.
खा.प्रितमताई मुंडे उद्या दि.14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वा.आष्टी तालुक्यातील सावरगाव, 12.30 वा.गंगादेवी, 1.00 वा.देवी निमगाव त्यानंतर शिरूर तालुक्यातील पिंपळनेर, सिंदफना, गोमळवाडा, कोळवाडी, शिरूर, झापेवाडी, आनंदगाव, बावी, ब्रह्मनाथ येळंब, नांदेवली, निमगाव मायंबा, तिंतरवणी आदी गावांना भेटी देवुन अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची त्या पाहणी करणार आहेत. उद्या दिवसभर आष्टी आणि शिरूर तालुक्यात पाहणी केल्यानंतर त्या परळीकडे रवाना होणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी 15 सप्टेंबर रोजी त्या परळी तालुक्यातील ममदापुर, बोरखेड, तेलसमुख, रामेवाडी, डिग्रस माजलगाव तालुक्यातील खतगव्हाण, मोगरा, सांडसचिंचोली, रोशनपुरी, शिंपे टाकळी या गावांना भेटी देऊन त्या ठिकाणच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. तसेच तिसऱ्या दिवशी 16 सप्टेंबर रोजी त्या गेवराई तालुक्यातील मारफळा, भेंडटाकळी, जातेगाव, टाकळगाव, चोपड्याची वाडी, राजापूर, तलवाडा या गावांना भेटी देऊन त्या ठिकाणच्या नुकसानीची त्या पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत, त्यांच्या या दौऱ्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा धीर मिळणार आहे, तसेच त्यांच्या याच दौऱ्यामुळे सरकारलाही शेतकऱ्यांना मदत करावी लागणार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!