बीड माजलगाव

गुरू पाठोपाठ शिष्यानेही सोडले प्राण

माजलगावात निःसीम भक्तीचा प्रत्यय

माजलगाव :- येथील सद्गुरू मिस्किन स्वामी मठाचे पूर्वमठाधिपती तापोरत्न प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य महाराज यांचे शुक्रवारी देहावसान झाले. त्यांचे निःसीम भक्त व महारांच्या सेवेत कायम असलेले विलास विठ्ठलाप्पा शेटे वय 45 यांचाही गुरुविरह सहन न झाल्याने शनिवार रोजी दुपारी 1 वा. 40 मी. हृदयविकाराने मृत्यू झाला. समाधी संस्कार पार पडल्यानंतर कांही वेळातच ही घटना झाल्याने गुरूंच्या पाठोपाठ शिष्यही सेवेसाठी गुरुचरणी लिन झाल्याची प्रचिती गुरुभक्तांना आली.
प्रख्यात गुरू शिवाचार्य महाराज हे शुक्रवारी पट्टाभिषेक कार्यक्रमानंतर शिवलिन झाले त्यांच्या समाधी संस्काराचा कार्यक्रम शनिवारी दुपारी 1 वाजता पार पडला. त्यानंतर एक विलक्षण घटना घडली ती म्हणजे शिवाचार्य महाराजांचे निःसीम भक्त तसेच मागील अनेक वर्षांपासून महाराजांच्या व्यक्तिगत सेवेत वाहून घेतलेले विलास विठ्ठलाप्पा शेटे याना अचानक त्रास सुरू झाला ही गोष्ट बराच वेळ त्यांनी कोणाला सांगितली नाही त्याच बरोबर ते देशाच्या विविध भागातून आलेल्या भक्तांच्या भोजनाच्या व्यवस्थेत लागले. हे करीत असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले व ते मठातच चक्कर येऊन पडले त्यांना त्या ठिकाणी तीव्र ह्रदयविकाराचा झटका आला व ते गुरु चरणी लीन झाले. ही घटना घडल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती. दरम्यान ही घटना घडल्यानंतर गुरुसेवेसाठी शिष्यालाही शिवलीन प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य महाराज यांनी बोलावले असल्याची भावना भक्तांमधून व्यक्त होताना दिसत होती.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!