बीड, दि. 9 (लोकाशा न्यूज) : बीड जिल्ह्याचे तात्कालिन अप्पर पोलिस अधिक्षक आणि सध्या औरंगाबाद येथे लोहमार्ग विभागाच्या पोलिस अधीक्षक पदी कर्तव्य बजावणारे वैभव कलूबर्मे यांची लातूर येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या याठिकाणी पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच अंबाजोगाईचे तात्कालिन अप्पर पोलिस अधीक्षक तथा राज्य गुप्ता वार्ता विभागाचे उपायुक्त अजित बोराडे यांची सातार्याला बदली करण्यात आली आहे. सातार्यात त्यांच्यावर अप्पर पोलिस अधीक्षकांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.