Uncategorized

सचिन घोडकेंना कायदा दाखवा, बार्शी नाक्यावर “काळे”कांड , दुकानात घुसून मारहाण


लोकाशा न्यूज  
एकीकडे पाउस धो धो बरसत असताना बीड शहरातील शोमेश्वर नगर मधील एका सलून मध्ये एक नेता दुकानदारांना धो धो बदडत होता , घोडका राजुरीचे सरपंच सचिन घोडके यांनी सलून चालकाच्या छातीवर वस्तऱ्याने वार केल्याचे नातेवावाईकांनी म्हटले आहे . शिवसेनेचे नेते असलेल्या सचिन घोडके यांनी सोमेश्वर नगर मध्ये काळे कांड केल्याने येथील नागरिकात भीतीचे वातावरण असून हल्लेखोराना कायदा दाखवण्याची मागणी येथील नागरिकातून होत आहे .  
  शहरातील सोमेश्वर या शांत भागात सोमेश्वर जेन्ट्स पार्लर ७ ऑ रोजी सायंकाळी ०७.३० वाजता सचिन घोडके यांनी भावासह अन्य पाच सहा लोकांनी येऊन राडा केला , सलून चालक  किरण भगवान काळे यांना गंभीर इजा करत जीवघेणा हल्ला केला . यामध्ये वस्ताऱ्याने काळे यांच्या छातीवर हल्ला केला , या जीवघेण्या हल्ल्याचे कारण समोर आलेले नसून या संदर्भात काळे यांनी शिवाजीनगर ठाणे येथे तक्रार दिली असून पोलिसांच्या सूचनेवरून काळे यांनी सरकारी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेल्याचे नातेवाईकानी कळवले आहे .  सचिन घोडके हे शिवसनेचे कार्यकर्ते असल्याचे बोलले जात असून त्यांच्या या हल्ल्यामुळे पक्षीय प्रतिमेचे देखील हनन झाल्याचे बोलले जात आहे . 

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!