Uncategorized

बीड जिल्ह्यात अतीवृष्टीने पीकांचे प्रचंड नुकसान,तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई द्या- राजेंद्र मस्के

बीड प्रतिनिधी

गेल्या तीन दीवसांपासुन बीड जिल्ह्यात सर्व दुर मुसळधार पाऊस पडला. शनिवारी रात्र भर झालेल्या जोरदार पावसाने जिल्ह्याला झोडपले. छोट्या मोठ्या नद्या तुडुंब भरु वाहु लागल्या आज गोदावरी नदी दुथडी भरुन वाहत आहेत. मनकरनीका सिंधपना  नदीला पुर आला आहे. दोन दिवसात जिल्ह्यात वार्षीक सरासरीच्या तुलनेत ६९मी.ली. पावसाची नोंद झाली. बीड, आष्टी, पाटोदा, केज, आंबाजोगाई, गेवराई आणि शिरुर तालुक्याला पावसाने अधिकचे झोडापले. लघु प्रकल्प ओवरफ्लो झाले आहेत. आज पुर्ण जिल्हा जलमय झाला आहे. या अतीवृष्टी मुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. जोरदार पावसामुळे नदी नाले ओढे व संपुर्ण शेत पीक जलमय झाले आहेत. मागील पंधारवाड्यात पावसाने तान दिल्याने पीके करपु लागली होती. तर या तीन दीवसातील जोरदार पावसाने पीके पाण्यात बूढु लागली. जिल्ह्यात शेत पीकांची परिस्थिती गंभीर झाली तुर, सोयाबीन, बाजरी, उडीद आणि शेतकऱ्याचे नगदी पीक  कापसाला तडाखा बसला. सोयाबीन, उडीद यांचे प्रचंड नुकसान झाले तुरीचे पीक पिवळे पडू लागले आहेत. एकंदरीत खरीपाचे नुकसान सहन करण्याची वेळ शेतकरी बांधवांवर येऊन ठेपली. वीमा कडुनही शेतकऱ्यांना विमा या पुर्वी मिळाला नाही. तंत्रीक अडचनी समोर करुन विमा कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पासुन वंचीत ठेवले आर्थिक संकटाच्या मालीकेत चालु अतीवृष्टीची नव्याने भर पडली. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे ७५ टक्के जिल्हा क्षतीग्रस्त झाला आहे. हवालदिल व चिंता ग्रस्त शेतकऱ्यांची काळजी घेने गरजेचे आहे. शासन आणि प्रशासनाने  बीड जिल्ह्यातील अतीवृष्टीची गांभीरयाने दखल घ्यावी व जिल्ह्यातील  अतिवृष्टीने नुकसान ग्रस्त शेत पीकांचे तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी मदतीचा हात पुढे करावा असे अवाहन भारतीय जनता पार्टी चे जिल्हाध्यक्ष  राजेंद्र मस्के यांनी केले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!