बीड, दि. 6 (लोकाशा न्यूज) : आपल्या कर्तव्यातून गुन्हेगारांना अद्दल घडविणारे कर्तव्य दक्ष अधिकारी भारत राऊत यांच्यावर आता बीड एसीबीच्या डीवायएसपी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्यामुळे भविष्यात बीड जिल्ह्यातील अनेक लाचखोर गजाआड झाल्याचे पहायला मिळणार आहे. त्यांची मागच्या महिणाभरापुर्वीच बीड एलसीबीतून एसीबीत बदली झाली होती, अखेर त्यांची उत्कृष्ट कामगिरी पाहूण त्यांच्या एसीबीने बीडचे डीवायएसपी पद त्यांच्याकडे बहाल केले आहे. याबद्दल त्यांचे संपूण जिल्हाभरातून अभिनंदन केले जात आहे.