बीड परळी

Exclusive व्हिडिओ, करूणा शर्माच्या गाडीत संशयित वस्तू ठेवतानाचा लाईव्ह व्हिडिओ, ‘ती’ वस्तू बंदूकच का?

बीड : गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असणाऱ्या करुणा शर्मा (Karuna Sharma) या आज बीड (Beed)मध्ये दाखल झाल्या होत्या. करुणा शर्मा या येणार असल्याने वैद्यनाथ परिसरात स्थानिक प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. दरम्यान, करुणा शर्मा यांना गाडीतून खाली उतरू देखील दिल जात नव्हत. एवढ असताना देखील करुणा शर्मा या गाडीखाली उतरल्या असता, त्यांना काही महिला धक्काबुक्की करताना दिसल्या. त्यानंतर पोलिसांनी करुणा शर्मा यांना पोलीस ठाण्यात घेऊन गेले आणि शर्मा यांच्या कारची तपासणी केली असता त्यांच्या गाडीत बंदूक आढळून आली असल्याचं पहायला मिळालं आहे. मात्र, या घटनेनंतर एक व्हिडीओ समोर आला असून, तो व्हिडीओ अनेक शंका निर्माण करणारा आहे.

काय आहे त्या व्हीडीओमध्ये?

दरम्यान, हा व्हिडीओ १८ सेकंदाचा आहे. या व्हिडीओमध्ये करुणा शर्मा यांची गाडी पुढे पुढे जाताना दिसत आहे. पुढे मोठी गर्दी असल्याने गाडी कमी स्पीडने पुढे पुढे जात आहे. त्यादरम्यान, एक व्यक्ती करुणा शर्मा यांच्या कारची पाठीमागची गाडीची डिक्की उघडताना दिसत आहे. त्याचवेळेस दुसरी एक व्यक्ती करुणा शर्मा यांच्या गाडीच्या डिक्कीत काहीतरी संशयित वस्तू ठेवताना दिसत आहे. सदर, सशयित वस्तू ठेवलेल्या व्यक्तीने डोळ्यावर चष्मा आणि तोंड पूर्णपणे झाकलेलं दिसत आहे. सदर व्यक्तीने संशयित वस्तू ठेवून त्या ठिकाणाहून निघून गेली असल्याचं देखील पहायला मिळत आहे. दरम्यान हे सर्व घडताना पोलीस देखील त्यांच्या बाजूला पहायला मिळत आहेत. सदर घटनेनंतर करुणा शर्माच्या गाडीत पोलिसांना बंदूक आढळून आली. त्यामुळे गर्दीत गाडीची डिक्की उघडून ठेवलेली वस्तू बंदूकच होती का? की दुसर काय याचा तपास देखील आता पोलिसांनी लावणे गरजेचे आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!