बीड परळी

परळी पोलीस ठाण्यात करुणा मुंडे यांच्याकडून फिर्याद दाखल

बीड, दि. (लोकाशा न्यूज):- रविवारी दुपारी करुणा धनंजय मुंडे परळी शहरात दाखल झाल्यानंतर वैजीनाथाचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. परंतु परळी येथील स्थानिक महिला व कार्यकर्त्यांनी विरोध करत गोधळं करण्यात आला. यामुळे पत्रकार परिषद रद्द करत त्यांनी पोलीस बंदोबस्तात परळी पोलीस ठाणे गाठत फिर्याद दाखल करण्यात येत आहे. त्यांच्या सोबत त्यांचा मुलगाही उपस्थित आहे. यामुळे परळी शहर पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. गर्दीमुळे पोलीस प्रशसनही हातबल झाले आहे. पुढे पोलीस काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!