Uncategorized

गॕस दरवाढीच्या निषेधार्थ बीड राष्ट्रवादी महिला आघाडीकडुन मोदी सरकारला गौ-याची भेट, मराठवाडा समन्वयक अॅड प्रज्ञा खोसरे यांच्या नेतृत्वात आंदोलन

गॕस दरवाढीच्या निषेधार्थ बीड राष्ट्रवादी महिला आघाडी कडुन मोदी सरकारला गौ-याची भेट अॅड प्रज्ञा खोसरे मराठवाडा समन्वयक
बीड जिल्हा राष्ट्रवादी महिला आघाडी कडुन प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली मोदी सरकारला गौ-याची भेट पाठवुन आज बीड पोष्ट आॕफिस समोर अनोखे आदोलन केले.
जिल्हयातील महिला आघाडी मोदी सरकारच्या विरोधी धोरणा विरोधात सतत आंदोलन करत आहे.पण हे देशातील गोरगरिब विरोधी सरकार जाणिव पुर्वक प्रत्येक गोष्टींमध्ये महागाई वाढतच आहे एक जानेवारीला गॅस सिलेंडरचे भाव 694 रुपये होते तेच आता एक सप्टेंबरला 884.50 इतका दर वाढलेला आहे दररोज गॕस दरवाढचा आलेख वाढतच आहे असे झाले तर मोदी साहेबांच्या कृपेने येणाऱ्या दिवाळीपर्यंत एक हजाराचा पल्ला गाठेल यात काही शंका नाही महिलांचे आर्थिक बजेट कोलमडून महिलांना घर चालवणे कठिण बनले आहे त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधी धोरणा विरोधात बीड राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतिने आज शनिवार रोजी बीड पोष्ट आॕफिस समोर मोदी सरकार चले जावो आणि “अक्कड बक्कड बंबे बो पेट्रोल का भाव पुरा सौ” अशा घोषणा देत व मोदी सरकारच्या नावाने गौ-या पाठवुन आंदोलन केले.
या आंदोलनात ॲड प्रज्ञा खोसरे (मराठवाडा समन्वयक) अनिताताई वाघमारे (तालुका कार्याध्यक्ष) राणीताई शेख (जिल्हा सचिव) आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!