Uncategorized

आर्यमनच्या उच्च शिक्षणासाठी पुढील दहा दिवस पंकजाताई Boston मध्ये !

बीड, हा आठवडा नक्कीच सर्व जण म्हणत असतील “पंकजा कुठे आहे?”.. मी अगदी समर्पित भूमिका बजावत आहे!! आणि भूमिका ती मी नेहमी आवडीने बजावत असते. माझ्या आर्यमन च्या आई च्या रोल मध्ये मी 100 टक्के आहे, किमान पुढचे 8 ते 10 दिवस.. आर्यमन आता #Boston मध्ये उच्च शिक्षण घेणार आहे.. मी त्याच्या hostel वर त्याला सोडण्यासाठी आले आहे.. आर्यमन ची 10 वी झाली, 12 वी झाली मी हवा तेवढा वेळ देऊ शकले नाही,10 वी च्या परीक्षा चालू होत्या एकही पेपर च्या साठी मी उपस्थित नव्हते, तेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत्या.. आता लेकरू 4 वर्ष नाही म्हणुन संपूर्ण वेळ त्याला देत आहे.. म्हणुन कशावर काही टिप्पणी न करता बघते आहे राज्याच्या आणि देशाच्या घडामोडी .. तरीही इथे देखील घडले असे की मध्य प्रदेश च्या लोकांनी मला डाळ बाटी च्या कार्यक्रमासाठी बोलावले आणि मी प्रभारी असल्यामुळे हक्काने पोचले विदेशी वातावरणात आपल्या जेवणाच्या स्वादाची मजा वेगळीच आहे.. त्यांचे देशाच्या विषयी प्रेम आणि काही सेवा करण्याच्या इच्छा पाहून मी प्रभावित झाले.. खूप बोलले, अनेक कार्यक्रम ही ठरले. शेवटी इथे ही नाही म्हणाले तरीही बीजेपी च्या राष्ट्रीय सचिव या भूमिकेत, राजकारणाच्या भूमिकेत आलेच !! पण part time कारण priority आर्यमन आहेच.. आज जन्माष्टमी साजरी होत आहे तिथे जात आहे… सर्वांना अभिमान वाटेल असा विषय म्हणजे इथे असणाऱ्या भारतीय लोकांनी स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाले आहेत त्याबद्दल मध्य प्रदेश मधली 75 गाव smart करण्यासाठी योगदान देण्याचे ठरवले आहे.. लहान मुलानी आपल्या pocket money मधून 75 cents पासून 75 dollar पर्यंत रक्कम रोज 75 दिवस जमा करून स्मार्ट एजुकेशन साठी गरज असणाऱ्या भारतीय मुलांना laptops किवा smartphone देण्याचा plan तयार केला आहे… अनेक अश्या गोष्टी पाहून मी आनंदी झाले, नुसता भारतीय भोजनाचा स्वाद नाही तर देशाच्या अभिमानाचा गोडवा ही जिभेवर रेंगाळत आहे … जय हिंद म्हणताना यांचे डोळे चमकताना पाहून माझ्या डोळ्याच्या कडा पाणावल्या पण आनंदाने… माझा आर्यमन एकटा कसा राहील असं वाटत आहे पण इतके पालक मिळाले की हायसे वाटले, असे पंकजाताईंनी आपल्या फेसबुकवर म्हटले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!