Uncategorized

जालन्यात डॅशींगपणे कर्तव्य बजावणार्‍या पीएसआय पल्लवी जाधव यांच्याकडे आता गेवराईची जबाबदारी ! राष्ट्रीय महामार्गाच्या गेवराई केंद्र सुरक्षा पथकात झाली नियुक्ती


गेवराई, दि. 28 (लोकाशा न्यूज) : सध्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक क्षेत्रात महिला उंच भरारी घेताना दिसून येत आहेत. प्रत्येक क्षेत्रात महिला आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवित आहेत. पोलिस खात्यातही महिलांची उल्लेखनीय कामगिरी पहायला मिळत आहे. या पुर्वी बीड जिल्ह्यात तात्कालीन डीवायएसपी ज्योती क्षीरसागर, एपीआय विशाखा धुळे, एपीआय दिपाली गिते, पीएसआय मनिषा जोगदंड यांनी आपल्या कर्तव्यातून अनेकांना न्याय मिळवून दिला तर सध्या जिल्ह्यात अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, एपीआय सुरेखा धस, पीएसआय राणी सानप ह्याही अत्यंत चोख पध्दतीने कर्तव्य बजावत आहेत. जालन्यात डॅशींगपणे कर्तव्य बजावून महिला मुलींची सुरक्षा करणार्‍या पीएसआय पल्लवी जाधव यांची आता राष्ट्रीय महामार्गाच्या गेवराई केंद्र सुरक्षा पथकात नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्याला पुन्हा एक डॅशींग महिला पोलिस अधिकारी मिळाली आहे. याही ठिकाणी दिलेली जबाबदारी पल्लवी जाधव अत्यंत चांगल्या पध्दतीने पार पाडतील असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे.
जिद्द, चिकाटी आणि संघर्ष सोबतीला असला की मग काहीच अशक्य नसतं. याचीच प्रचिती आलेली आहे. पल्लवी जाधव यांनी दामिनी पथक जालना याठिकाणी उत्तम प्रकारे जबाबदारी संभाळलेली आहे. आजवर पोलिस खात्यात केलेल्या प्रमाणिक कामाच्या बदल्यात पल्लवी जाधव यांची बीड महामार्ग सुरक्षा पथक येथे नव्याने नियुक्ती झालेली आहे. खुप संघर्षातून इथपर्यंत त्या आलेल्या आहेत. कन्नड तालुक्यातील त्या संघर्षातून व कष्टकरी शेतकरी कुटूंबातील कन्या आहेत. गुन्हेगारांवर नजर ठेवण्यात जेवढे त्या सतर्क असतात, तेवढ्याच त्या कायद्याच्या बाबतीत देखील निर्णायक असतात. त्यांनी जालना येथील दामिनी पथकामध्ये खुप चांगले काम केलेले आहे. आता त्यांना नव्याने जबाबदारी मिळाली आहे, हीही जबाबदारी त्या अत्यंत चांगल्या पध्दतीने पार पाडतील असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे.

कर्तव्य बजावण्यास एपीआय
बांगरांची टिम सक्षम
एपीआय प्रविणकुमार बांगर हे अत्यंत हुशार आणि चाणक्य अधिकारी आहेत. त्यांनी यापुर्वी बीड वाहतूक शाखेत आपले कर्तव्य बजावलेले आहे. वाहतूक शाखा काय आणि कशी काम करू शकते हे त्यांनी आपल्या कर्तव्यातून संपूर्ण जिल्ह्याला खर्‍या अर्थाने दाखवून दिलेले आहे. आता ते राष्ट्रीय महामार्गावर आपले कर्तव्य बजावत आहेत. मागच्या आठ दिवसांपुर्वीच त्यांनी एक विशेष कामगिरी केली होती, त्यानुसार कर्तव्य बजावण्यास ते आणि त्यांची संपूर्ण टिम सक्षम असल्याचे दिसून येते. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविणकुमार बांगर यांच्यासह घोळवे, मिसाळ, जोगदंड, उबाळे, तांदळे, नेवडे, शेळके, पालवे, परळकर, परजणे,गिरी, तुकाराम किरकट आदी सिनीयर तसेच काही हुद्याने लहान असले तरी अनुभवाने मोठे असलेल्या सहकारी समवेत आता पीएसआय पल्लवी जाधव ह्या चोखपणे कर्तव्य पार पाडणार आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!