जालना, दि. 27 (लोकाशा न्यूज) : बीडच्या खासदार प्रीतमताई गोपीनाथराव मुंडे यांनी बुधवारी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांना राखी बांधून औक्षण केले. ‘भाऊं’ना सुख-समृद्धी, निरोगी आयुष्य आणि सुयश चिंतिले मराठवाड्याच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या लहान भगिनी असलेल्या प्रीतमताईंनी दर्शना बंगल्यावर येऊन अर्जुनराव खोतकर यांना राखी बांधली. खोतकर आणि मुंडे कुटुंबातील ऋणानुबंधास यावेळी उजाळा मिळाला. ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणीने अर्जुनराव खोतकर यांना यावेळी गहिवरून आले. ताई, मी सदैव आपल्या पाठीशी राहील, अशी ग्वाही ’भाऊ’ म्हणून अर्जुनराव खोतकर यांनी दिली तर एक बहीण म्हणून मी कधीच खोतकर परिवाराला अंतर देणार नाही, अशा भावना यावेळी प्रीतमताईनी व्यक्त केल्या्. मुंडे आणि खोतकर परिवारातील नाते राखीच्या निमित्ताने दृढ झाल्याचे पहावयास मिळाले. यावेळी सौ. सीमाताई खोतकर, योगिताताई खोतकर, अभिमन्यू खोतकर यांच्यासह संपूर्ण परिवार उपस्थित होता.